Goa News | Governor Sreedharan Pillai Dainik Gomantak
गोवा

Goa Governor: राज्यपालांहस्ते जुन पर्यंत 850 पेक्षा जास्त गरजू नागरीकांना आर्थिक मदत

गोव्यातील गरजु नागरीकांना मदत करण्याचा निर्णय घेतला असे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले

दैनिक गोमन्तक

सासष्टी: गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यानी आज सासष्टी तालुक्याचा दौरा केला व राय येथे 11 डायलेसिस व 7 कर्क रोग रुग्णांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान केली. राज्यपालांकडे मर्यादीत निधी असतो. आपण हा निधी राजभवनावर खर्च न करता गोव्यातील गरजु नागरीकांना मदत करण्याचा निर्णय घेतला असे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले.

(Governor has provided financial assistance to over 850 needy citizens till June)

सुरवातील आपले उद्दीष्ट केवळ 70 रुग्णांना आर्थिक मदत करण्याचे होते. पण गत 16 ते 18 महिन्यात आपण 850 गरजुंना मदत करु शकलो याचा आपल्याला अभिमान वाटतो असेही राज्यपालांनी सांगितले.

भारत हा कृषिप्रधान देश आहे व कृषि हेच उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे त्यामुळे युवकांनी कृषि उत्पादनावर भर देण्याचे आवाहन त्यानी या वेळी केले. आपण त्यांच्या सोबत आहोत अशी नागरीकांची भावना व्हावी हाच समाजसेवे मागचा आपला मुख्य हेतू असल्याचेही राज्यपालांनी सांगितले.

महात्मा गांधीनी ग्राम स्वराज्य हे तत्व पाळले. सर्वांपेक्षा लोकच सर्वोच्च असल्याचे ते मानीत. त्याचसाठी आपण इथे आल्यापासुन जास्त ग्रामीण भागांना भेटी देत असल्याचे ते म्हणाले.. राय येथील कार्यक्रमात राशोल, कामुर्ली, कुडतरी व राय सरपंचांनी आपल्या समस्या लेखी राज्यपालांना सादर केल्या. आपण तुमचे प्रश्र्न मुख्यमंत्र्यांच्या कानावर किंवा केंद्र सरकारकडे मांडू असे राज्यपालांनी सांगितले. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यानी राज्यपालांचे स्वागत केले.

पंचायतीच्या ज्या समस्या, सुचना आहेत, त्या आपल्याकडे मांडाव्यात असे त्यांनी सरपंंच व पंचांना सांगितले. त्यानी पुढे सांगितले की कुडतरीतील पोलिस क्वॉटर्सचे काम स्थगीत ठेवले असुन सोनसोडो येथील पोलिस स्टेशनचे काम लवकरच सुरु केले जाईल.

या कार्यक्रमानंतर राज्यपालांनी राशोल सेमीनारीला भेट दिली. फादर आलेशो मिनेझीस यानी त्यांचे स्वागत केले. गोवा संपुर्ण यात्रा अंतर्गत राज्यपालांनी संध्याकाळी कुंकळ्ळी येथील मार्टिर्स (चेफ्टन) स्मारकाला भेट दिली व ते चांदर येथे रवाना झाले. तेथे त्यानी पाड्डे, माकाझन, चांदर, कावरे, गिर्दोळी या पंचायतीतील सरपंच व पंचाशी संवाद साधला व मिनेझीस ब्रागांझ घराला भेट दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT