viriato Fernandes  Dainik Gomantak
गोवा

Madgaon News : सरकारचे वीज खात्याकडे दुर्लक्ष; विरियातो फर्नांडिस यांचा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव, तम्नार प्रकल्पाचे वेड लागलेल्या भाजप सरकारने कामावर असलेल्या वीज कर्मचाऱ्यांसाठीच्या सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केले.

आज विजेच्या धक्क्याने प्राण गमावलेल्या महेश जांबावलीकर यांच्या कुटुंबीयांना माझ्या संवेदना. मी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी करतो, असे काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी म्हटले आहे.

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांना गोव्याचे वीजमंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नाही. स्वत:च्या विभागातील कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्यात ते अपयशी ठरले आहेत. त्यांच्या निष्काळजीपणाच्या कृत्याचा मी निषेध करतो, असे फर्नांडिस म्हणाले.

दक्षिण गोवा ७ मे रोजी श्रीमंत समर्थक आणि गरीब विरोधी भाजप सरकार नाकारेल आणि लोकशाही वाचवा आणि गोवा वाचवा याला मत देईल, असा विश्वास कॅ. फर्नांडिस यांनी व्यक्त केला.

‘वीज खाते म्हणजे मोठा घोटाळा’

गोव्यात गेल्या ५ वर्षांत वीज वितरण प्रणालीची देखभाल आणि सुधारणा करण्यासाठी सरकारने १२ हजार कोटी रुपये खर्च केले. मात्र, ही रक्कम वीजमंत्री आणि भाजप कार्यकर्त्यांच्या तिजोरीत गेली आहे.

त्यामुळे गोमंतकीयांना सतत वीज खंडित होण्याचा सामना करावा लागत आहे. वीज खाते म्हणजेच एक मोठा घोटाळा झाला आहे. असे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT