e-Buses in Goa  Dainik Gomantak
गोवा

Panjim News: पणजीत खासगी बसमालकांना दिलासा! ई-बसेससह खासगी बससेवा सुरू राहणार

Panaji News: पणजीतील खासगी बसेस बंद करण्याची निर्णय सरकारने घेतला होता त्याला याचिकादार ताम्हणकर यांनी आव्हान दिले होते

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Bus Service

पणजी: पणजी शहरात कदंबच्या ई-बसेससह सध्या सुरू असलेल्या खासगी प्रवासी बसेस सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आज देण्यात आली. त्यामुळे खासगी बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांची याचिका निकालात काढण्यात आली.

पणजी (Panaji / Panjim) शहरातील खासगी प्रवासी बसेस बंद करण्याची निर्णय सरकारने घेतला होता त्याला याचिकादार ताम्हणकर यांनी आव्हान दिले होते. या निर्णयात सरकारने दुरुस्ती करून त्यांनाही बससेवा सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

या याचिकेवरील सुनावणीवेळी याचिकादारातर्फे खासगी बसेसना वाहतूक खात्याकडून परवान्याचे नुतनीकरण केले जात नसल्याचे खंडपीठासमोर बाजू मांडण्यात आली. हा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आलेला नाही. याचिकादाराने परवान्याच्या नुतनीकरणासाठी संबंधित खात्याकडे अर्ज करावा आणि नाकारण्यात आल्यास त्याला नव्याने आव्हान दिले जावे, अशी तोंडी सूचना खंडपीठाने केली.

सरकारने खासगी प्रवासी बसेस सुरू ठेवण्यात परवानगी दिल्याने त्या बसेसच्या परवान्याच्या नुतनीकरण करणे आवश्‍यक असा दावा ताम्हणकर यांनी केला होता. मात्र हा मुद्दा याचिकेत नाही व याचिकादाराने केलेली विनंती पूर्ण झाल्याने ती निकालात काढली.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पणजी शहरात ई-बसेस सुरू करण्यासंदर्भातची दखल गोवा खंडपीठाने स्वेच्छा याचिकेत घेतली होती. शहरातील वाहतूक व्यवस्थापन आराखड्याचा भाग म्हणून या ई-बसेस सुरू करण्यासंदर्भात विचारल्यानंतर कदंब वाहतूक महामंडळाने शहरातील विविध अंतर्गत मार्गावर या ई-बसेस सुरू करण्याचा निर्णय घेताना खासगी बस मालकांना त्यांची सेवा बंद करण्याची अधिसूचना जारी केली होती. त्याला गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. मात्र सरकारने त्या अधिसूचनेत दुरुस्ती करून या खासगी बसेसही सुरू राहतील, अशी माहिती उच्च न्यायालयाला दिली होती.

चाळीस ई-बसेस!

सध्या पणजी शहरात कदंब वाहतूक महामंडळाच्या सुमारे ४० ई-बसेस विविध अंतर्गत मार्गावर धावत आहेत तसेच सुमारे ८० खासगी प्रवासी बसेसही या शहरात वाहतूक करत आहेत. या ई-बससेवेमुळे ज्या ठिकामी वाहतूक व्यवस्था नव्हती तेथूनही लोकांना प्रवासाची सोय झाली आहे. ताळगाव ते सांताक्रुझ या मार्गावर खासगी बससेवा नव्हती, मात्र ई-बसेस सुरू झाल्याने लोकांना ताळगाव येथून सांताक्रुझ जाणे सोपे झाले आहे. यापूर्वी ताळगाव येथून पणजी बसस्थानकावर जावे लागत होते व त्यानंतर तेथून सांताक्रुझ येथे जाण्याची पाळी येत होती. त्यामुळे अधिक वेळ वाया जात होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT