गोवा मुक्तीदिन

 

Dainik Gomantak 

गोवा

डिचोलीत शासकीय मुक्तीदिन सोहळा उत्साहात

पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांकडून मानवंदना स्वीकारताना आमदार प्रवीण झांट्ये आर्थिक बळकटीसाठी खाण सुरु होणे आवश्यक: झांट्ये

दैनिक गोमन्तक

डिचोली: कोविड महामारीमुळे (Covid 19) राज्याच्या आर्थिक व्यवस्थेसह विकास प्रक्रियेवरही परिणाम झालेला आहे. राज्याची आर्थिक घडी जाग्यावर येण्यासाठी खाण व्यवसाय सुरु होणे आवश्यक आहे, असे मत मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांनी डिचोली येथे बोलताना व्यक्त केले.

वाहतूक पोलिस (police) खात्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक पुतुलो गाड यांचा उत्कृष्ट सेवेबद्दल प्रमुख पाहुणे झांट्ये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपजिल्हाधिकारी वायंगणकर यांनी आपले विचार मांडले. सरकारी हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी (Student) देशभक्तीपर गीत सादर केले. निवृत्त अधिकारी परब आणि ज्येष्ठ नागरिक प्रकाश शिरोडकर यांनी कविता सादर केल्या.

साठाव्या गोवा मुक्तीदिनानिमित्त शासकीय पातळीवरील सोहळ्यात झांट्ये प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. याप्रसंगी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर, संयुक्त मामलेदार श्रीपाद माजिक, गट विकास अधिकारी श्रीकांत पेडणेकर आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते सीताराम नाईक उपस्थित होते. तत्पूर्वी आमदार झांट्ये यांनी ध्वजारोहण केल्यानंतर पोलिस आणि अग्निशमक दलाच्या (Fire brigade) जवानांकडून मानवंदना स्वीकारली. सूत्रसंचालन अजित परब यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT