Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Government Job : गोव्यात यापुढे नोकरभरती आयोगामार्फतच होणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा; लोकसेवा आयोगासह मनुष्यबळ विकास महामंडळाची घेणार मदत

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Government Job : राज्यात यापुढे होणारी नोकरभरती ही सरळ अथवा शिफारशीने न करता गोवा राज्य लोकसेवा आयोगामार्फतच केली जाईल. यासाठी आयोगाबरोबरच मनुष्यबळ विकास महामंडळाची मदत घेतली जाणार असून ही प्रक्रिया केंद्र सरकारने घालून दिलेल्या भरती प्रक्रियेनुसार करण्यात येईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्यात विविध खात्यांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल. मात्र, यासाठी राज्य लोकसेवा आयोगाने घालून दिलेल्या शिफारशींची काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी केली जाईल. याशिवाय ही संपूर्ण प्रक्रिया या स्वतंत्र आयोगामार्फत केली जाईल. खात्यांतर्गत भरतीसाठी आवश्यकता पत्रे आणि रिक्त पदांचा तपशील आयोगाला सादर करण्यात येईल. आयोग त्याप्रमाणे रिक्त पदांची उद्घोषणा करून परीक्षा, मुलाखत आणि निकाल या पद्धतीने भरून ती राज्य सरकारला सादर करेल.’

दरम्यान, यापूर्वी नोकरभरतीमध्ये काही चुकीच्या घटना घडल्याच्या राज्य सरकारच्या निदर्शनास आले आहे. याशिवाय गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नोकरभरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक घोटाळा झाल्याची प्रकरणे समोर आली होती, त्यामुळे सरकारने भरतीसाठी यावेळेस कडक उपाययोजना राबविण्याचे धोरण अवलंबिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT