Nilkanth Halarnkar  Dainik Gomantak
गोवा

Milk Production: राज्यात दुग्ध उत्पादन वाढीसाठी कामधेनू योजनेंतर्गत सरकार प्रयत्नशील; मंत्री हळर्णकरांची माहिती

राज्य सरकारच्या पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा खात्याच्या वतीने कामधेनू योजनेंतर्गत दुग्ध वाढीचा प्रयत्न नियमित होत असतो.

Kavya Powar

Milk Production in Goa: राज्य सरकारच्या पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा खात्याच्या वतीने कामधेनू योजनेंतर्गत दुग्ध वाढीचा प्रयत्न नियमित होत असतो. यावेळी खात्याचे अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर जाऊन योजनेची माहिती देऊन दुग्ध उत्पादन वाढीसाठी कामधेनू योजनेची माहिती देण्याचा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी दिली.

हळर्णकर म्हणाले की, या योजनेतून शेतकऱ्यांना व युवकांना या व्यवसायाकडे वळवावे, यासाठी आकृष्ट करण्याचा प्रयत्न आहे. राज्य सरकार कामधेनू योजनेमार्फत विविध प्रकारच्या गाई-म्हैस खरेदीसाठी अनुदान देते. राज्यातील दुग्ध विक्रेत्यांकडून गोवा दूध संघाच्या दुधाची मागणी वाढत आहे, त्यामुळेच उत्पादन वाढणे आवश्‍यक आहे.

त्यासाठीच डिसेंबरपर्यंत ग्रामीण भागात अधिकारी व डॉक्टर जाऊन योजनांची माहिती देणार आहेत.राज्यातील गोवा दूध संघाला दररोज आपला कोटा पूर्ण करण्यासाठी परराज्यातून दहा ते पंधरा हजार लिटर दूध मागवावे लागते.

मागील कित्येक वर्षांपासून राज्य सरकार दुग्ध वाढीसाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठीच कामधेनू योजना राबविली आहे, या योजनेला हवी तशी गती मिळावी आणि त्याकडे राज्यातील युवकांनीही वळावे, पशुपालन करून त्यातून दुग्ध उत्पादन व्हावे अशी अपेक्षा खात्याची आहे. त्यासाठीच खात्याच्या वतीने जनसंपर्क मोहीम राबविली जात असल्याचे हळर्णकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT