Government ignores 'Mopa' victims Dainik Gomantak
गोवा

‘मोपा’ पीडितांकडे सरकारचे दुर्लक्ष

शेतकऱ्यांची खंत: जमिनी गमावलेल्यांच्या नुकसान भरपाईप्रश्‍नी तोडगा काढावा

दैनिक गोमन्तक

मोरजी: मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी धारगळ-सुकेकुरण ते मोपा विमानतळ पर्यंतचा साडे सहा किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल वजा लिंक रोडचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी, शेती, बागायती या विमानतळ प्रकल्पासाठी संपादित झालेल्या आहेत, त्यांच्याकडे सरकारने कानाडोळा केल्याची खंत प्रकल्प पीडितांकडून व्यक्त होत आहे.

लिंक रोडसाठी संबंधित कंपनीने पर्यावरण दाखला न घेतल्याचा दावा करून पीडित शेतकऱ्यांनी हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे. शेतकऱ्यांच्या याचिकेवर आता सुनावणी 14 जून रोजी होणार आहे. या याचिकेचा निकाल काहीही लागला तरीही शेतकऱ्यांच्या समस्यांचे आणि व्यथांचे सरकारला सोयरसुतक नसल्याची टीका पीडित शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

पीडित शेतकरी रमाकांत तुळसकर म्हणाले,की गेले वर्षभर येथील शेतकरी जनआंदोलन आणि कायदेशीर लढाईद्वारे लढत आहेत. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी प्रवीण आर्लेकर यांनी शेतकऱ्यांची भेट का घेतलेली नाही,असा सवाल लोक करत आहेत. सरकारने तातडीने भरपाईच्या प्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक घ्यावी.

मोपा लिंक रोडसाठी हजारो झाडे कापण्यात आली. तर बहुतांश झाडे बुलडोझरने मुळासकट उखडून टाकली. पर्यावरणाची मोठी हानी झाल्याचेही दिसून येते. ‘मोपा’वरून पहिले उड्डाण 15 ऑगस्ट रोजी होणार असून त्यासाठी लिंक रोडचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी अशोका बिल्डर कंपनीने हा रस्ता 18 महिन्यात बनवावा, असा करार आहे. तरीही तो कंपनी बारा महिन्यात पूर्ण करेल, असा विश्वास कंपनीचे काही पर्यवेक्षक व्यक्त करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

MP Liquor Death: मध्य प्रदेशात विषारी दारूचा हाहाकार! 9 जणांचा मृत्यू, 10 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक

Tarun Tejpal: तरुण तेजपालच्या शिक्षावाढीच्या याचिकेला ब्रेक! सर्वोच्च न्यायालयात सुनावणी तहकूब

खरी कुजबुज: फातोर्ड्यात नक्की कोण?

SCROLL FOR NEXT