‘त्या’ कुटुंबाला सहानुभूती दाखवा : मार्टिन्स Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील ‘त्या’ कुटुंबाला सहानुभूतीची गरज

कोठंबी (ता. डिचोली) येथील एका कुटुंबावर झालेल्या अन्यायाबाबत गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा केला जात आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: कोठंबी (ता. डिचोली) येथील एका कुटुंबावर झालेल्या अन्यायाबाबत गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा केला जात असतानाही त्याकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप ‘बायलांचो साद’ या संघटनेने केला आहे. काल आझाद मैदानावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सबिना मार्टिन्स यांनी या कुटुंबाबत मानवी हक्क आयोगाने सहानुभूती दाखवावी, अशी मागणी केली. दोन वर्षांपूर्वी एका कुटुंबावर अज्ञातांनी हल्ला केला. त्यानंतर त्यांचे घर जमीनदोस्त केले. त्याच कुटुंबावर गुन्हा दाखल करून त्यातील सदस्यांना अटक करण्यात आली. त्यातील अल्पवयीन मुलीला जाणीवपूर्वक त्रास देण्यात आला. (Government has not taken injustice done to family in Goa seriously for last two years)

हा महिला अत्याचाराचा हा प्रकार असल्याने याबाबत महिला आणि मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. हे प्रकरण न्यायालयात आहे. सध्या आई-मुलगीला एकीकडे तर बाप-मुलाला दुसरीकडे स्थानबध्द करण्यात आले आहे. हा प्रकार गंभीर असून राज्य सरकारने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अफरोझ शेख, पुष्पा पेडणेकर आणि अनामिका हरमलकर उपस्थित होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT