Accident
Accident Dainik Gomantak
गोवा

वृद्धाच्या अपघाती मृत्यूनंतर अखेर सरकारला जाग

दैनिक गोमन्तक

पणजी : चिंबल जंक्शन हा मृत्यूचा सापळा बनल्याने तेथे गतिरोधकाची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले त्याचा परिणाम म्हणून एका वृद्धाचा रस्ता ओलांडताना ट्रकच्या ठोकरने मृत्यू झाला. स्थानिक जमावाने रस्ता अडवून काल बुधवारी आणि आज शुक्रवारी आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर सरकारी यंत्रणेला जाग आली. (government finally wakes up after the accidental death of an old man)

अपघात होऊन चोवीस तासाच्या आत जंक्शनवर रम्बलर आणि गतिरोधक उभारण्याचे काम सुरू झाले. सरकारी यंत्रणेच्या या चालढकलपणाबाबत जमावाने संताप व्यक्त करत तेथील उड्डाण पुलाचे बांधकाम त्वरित सुरू करण्याची मागणी केली.

काल बुधवारी संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास एका स्थानिक वृद्धाचा रस्ता ओलांडताना ट्रकच्या धडकेने जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर जंक्शनवर लोक मोठ्या प्रमाणात जमून त्वरित गतिरोधक उभारण्याची मागणी केल्यानंतर ते आजपर्यंत उभारण्यात येईल असे आश्‍वासन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिले मात्र आज गुरुवारी सकाळपर्यंत कोणतीच कार्यवाही न झाल्याने स्थानिक पुन्हा आक्रमक बनले. जोपर्यंत या ठिकाणी गतिरोधक उभारण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा मृत्यू झालेल्या कुटुंबियांने घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.

व्यंकटेश कारापूरकर या 72 वर्षीय वृद्धाचा ट्रकने दिलेल्या धडकेत चिंबल जंक्शनवर रस्ता ओलांडताना मृत्यू झाला होता. यापूर्वीही या जंक्शनवर अनेकजणांचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे. तीन वर्षापूर्वी या ठिकाणी वाहतूक सिग्नल उभारण्याबरोबरच गतिरोधक उभारण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र वाहतूक सिग्नल घालण्यात आले मात्र गतिरोधक नसल्याने कदंब पठारावरून चिंबल जंक्शनकडे येत असताना असलेल्या उतरणीमुळे अवजड वाहने चालकांच्या नियंत्रणात राहत नसल्याने अपघात घडले आहेत. त्यामुळे भविष्यात मोठे अपघात घडण्याची शक्यता स्थानिकानी वर्तवून आंदोलने केली होती मात्र कोणीही त्याकडे लक्ष दिले नसल्याने जमावाने संतप्त व्यक्त केला.

उड्डाण पूल काम पूर्ण करा

चिंबल जंक्शन हा मृत्यूचा सापळा बनला आहे. या जंक्शनवर रस्ता ओलांडताना लोकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. या ठिकाणचे वाहतूक सिग्नल अनेकदा बंदच असतात त्यामुळे कदंब पठाराच्या उतरणीवरून या जंक्शनकडे वेगाने वाहने येतात. रस्ता ओलांडण्यास कित्येक वेळ वाट पाहावी लागते. या ठिकाणी उड्डाण पुलाची आवश्‍यकता आहे. अर्धवट उरलेल्या उड्डाण पुलाचे काम त्वरित सुरू करावे. बगल महामार्ग सुरू झाल्यापासून चिंबल जंक्शन हे धोकादायक बनले आहे. सरकारने या जंक्शनची गंभीर दखल घेत उड्डाण पूल कामाला सुरवात करण्याची मागणी सांताक्रुझचे आमदार रुदॉल्फ फर्नांडिस यांनी केली.

सरकारचा चालढकलपणा
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काल गतिरोधक उभारण्याचे आश्‍वासन देऊनही त्याचे काम आज सकाळी सुरू झाले नाही. गतिरोधक उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढायला हवी. ती काढण्यासाठी किती वेळ लागतो. जर सरकार एका दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हेलीपॅड उभारू शकते तर लोकांचा मृत्यू होतो अशा ठिकाणी तत्परतेने गतिरोधक का उभारता येत नाहीत, असा सवाल आपचे गोवा अध्यक्ष अमित पालेकर यांनी केला.

मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा
व्यंकटेश कारापूरकर यांचा रस्ता ओलांडताना अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या अपघातात कोणाचाही मृत्यू होऊ नये यासाठी जोपर्यंत या ठिकाणी गतिरोधक उभारण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय कारापूरकर कुटुंबियाने घेतला. त्यामुळे सरकारी यंत्रणा खडाडून जागी झाली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न होऊ नये यासाठी सरकारी पातळीवर यंत्रणा गतिमान झाली व दुपारनंतर काम सुरू झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

OpenAI ची मोठी तयारी, ChatGPT नंतर सर्च इंजिन करु शकते लॉन्च; Google ला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT