CM Pramod Sawant  twitter
गोवा

Goa Government: सामाजिक कल्याण आणि लोकहिताच्या योजनांवर सरकारचा भर; CM प्रमोद सावंत

अंत्योदय तत्त्वानुसार ‘स्वयंपूर्ण गोवा’ बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant: देशातील इतर राज्यांनी आपल्या राज्याचे अनुकरण करावे असा स्वावलंबी गोवा बनविणे हे सरकारचे ध्‍येय आहे. अंत्योदय तत्त्वानुसार ‘स्वयंपूर्ण गोवा’ बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

येथील जुन्या सचिवालयासमोर स्वातंत्र्यदिनाच्‍या मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण केल्‍यानंतर ते बोलत होते. गोवा पोलिस दलासह इतर दलांनी दिलेली मानवंदना स्वीकारून मुख्‍यमंत्र्यांनी संचालनाची पाहणी केली.

यावेळी पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, ॲडव्‍होकेट जनरल देविदास पांगम, खासदार सदानंद शेट तानावडे, मुख्य सचिव पुनित गोयल, पोलिस महासंचालक जसपाल सिंग, सरकारचे सचिव, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करताना 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपाययोजना आखल्या जात असल्याचे सांगितले. विविध उपक्रम, धोरणे आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण आपल्या राज्यालाही सक्षम बनवुया, असेही ते म्हणाले. सामाजिक कल्याण आणि लोकहिताच्या योजनांवर सरकारने भर दिला आहे. साक्षरतेच्या बाबतीत गोवा राज्य देशात सर्वोच्च स्थानावर आहे. 62 होमगार्डना पोलिस सेवेत नियमित करण्‍यासाठी नियम शिथिल केल्याची माहिती त्‍यांनी दिली.

अधिकारी, मान्यवर, स्वयंपूर्ण मित्रांचा सन्मान

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलिस उपअधीक्षक सलीम शेख, कॉन्स्टेबल सुधीर तळेकर यांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपतिपदक प्रदान करण्यात आले. तर प्रशांत धारगळकर यांना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

होमगार्ड कॅरोलिना फर्नांडिस, नारायण पागी यांनाही उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले. ‘स्वयंपूर्ण मित्र’ दीक्षा नामदेव तारी, प्रदीप सावंत, दत्तप्रसाद पालिनी,

हरिश्चंद्र गावडे आणि सुदेश नंदा गौडे यांचा सत्कार करण्यात आला. गोपाल दामोदर काकुलो यांनाही सन्‍मानित करण्‍यात आले.

लवकरच प्रत्येक घरापर्यंत इंटरनेट सुविधा देणारी ‘हर घर फायबर’ योजना सरकार सुरू करणार आहे. महिला सक्षमीकरणासाठीही सरकार कटिबद्ध आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत बनविण्याचे केंद्र आणि राज्य सरकारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण एकत्र काम करणे आवश्‍‍यक आहे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT