Cape  Dainik Gomantak
गोवा

Cape News : केपे महाविद्यालयात गांडूळ खत युनिटचे उद्घाटन ; जागरूकतेचा प्रयत्‍न

Cape News : अर्थशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र विभागाचा पुढाकार

गोमन्तक डिजिटल टीम

Cape News :

केपे, कला, विज्ञान आणि वाणिज्य शासकीय महाविद्यालय केपे येथील इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलने वनस्पतिशास्त्र विभाग आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात गांडूळ खत युनिटचे उदघाटन कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप यांनी केले.

यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. जॉयदीप भट्टाचार्य, वनस्पतिशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. मेहताब बुखारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी केपे पालिकेचे अधिकारी आणि स्वच्छता कामगारांचाही सक्रिय सहभाग दिसून आला. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. धिल्लन वेळीप आणि प्रा. के. संगीता आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

गांडूळ खताच्या मार्केटिंगची गरज : सगुण वेळीप

यावेळी कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप म्हणाले की, कचरा व्यवस्थापन समस्या सोडवण्यासाठी आणि मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल पद्धतींमध्ये योगदान देण्यासाठी गांडूळ खत युनिटच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा केपे सरकारी महाविद्यालयाचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

याव्यतिरिक्त, युनिटने उत्पादित केलेल्या खताचे मार्केटिंग केले जावे, तसेच केपे नगरपालिकेसोबत भागीदारी करून हा उपक्रम मोठ्या प्रमाणात वाढवावा, अशी शिफारस सगुण वेळीप यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT