Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रम उद्यापासून

मुख्यमंत्री : जनतेच्या प्रश्‍नांवर त्वरित तोडगा काढणार

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील जनतेच्या समस्या व त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रम येत्या 19 सप्टेंबरपासून म्हणजे उद्यापासून सुरू करण्यात येत आहे. या कार्यक्रमाची सुरवात प्रथम बार्देश तालुक्याच्या थिवी मतदारसंघातून होणार आहे. हा कार्यक्रम सर्व तालुक्यांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असून त्याचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी केले आहे.

या कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. सावंत म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी सरकार जनतेच्या समस्या व प्रश्‍न जाणून घेऊन त्या सोडविण्यास त्यांच्या दारी येणार असल्याचे आश्‍वासन दिले होते. गोवा मुक्तिदिनाच्या 60 व्या वर्षानिमित्त सरकारने हा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘जनतेने कार्यक्रमाचा लाभ घ्यावा’

विविध प्रकारचे दाखले तसेच प्रमाणपत्रे त्यामध्ये निवासी, उत्पन्न, कृषी किसान कार्ड किंवा कृषी क्रेडिट कार्ड, शिधापत्रिका कार्ड, वीज व पाणी जोडणी तसेच शौचालय समस्या, ईडीसीमार्फत स्वयंरोजगार सुरू करण्यासाठीची तसेच स्टार्टअप योजना सुरू करण्याची समस्या असे अनेक प्रश्‍न या कार्यक्रमांतर्गत सोडविले जाणार आहेत. या कार्यक्रमाचा जनतेने मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

याव्यतिरिक्त सरकारतर्फे ‘सर्वांसाठी आरोग्य व सर्वांसाठी दृष्टीक्षेप’ या संकल्पनेखाली या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या भागात आरोग्य संचालनालय तसेच गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या डॉक्टरांतर्फे लोकांची तपासणी करण्यासाठी इस्पितळातील तसेच सुपर स्पेशॅलिटीतील डॉक्टर उपलब्ध असणार आहेत. थिवी मतदारसंघातील कोलवाळ येथील श्रीराम विद्यामंदिर येथून कार्यक्रमाला सुरवात होणार आहे व तो सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असेल. अर्ज केलेल्या जनतेच्या समस्या व प्रश्‍न तिथल्या तेथे सोडवून न्याय दिला जाणार आहे, असे सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT