Goa Sport Dainik Gomantak
गोवा

Goa Sport : शास्त्रशुद्ध प्रशिक्षकांसाठी सरकारची योजना जाहिर; पारंगत खेळाडूंना मिळणार संधी

क्रीडा खात्याची अ​धिसूचना जाहीर

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Sport : राज्यातील पारंगत खेळाडूंना आता प्रशिक्षक बनण्याची संधी राज्य सरकार देणार आहे. याबाबतची योजना सरकारने जाहीर केली असून खेळाडूंनी योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 एप्रिलपर्यंत क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याशी संपर्क साधावा असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

धनुर्विद्या, वुशू आणि योगा, अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, बॅडमिंटन, बॉक्सिंग कॅनोइंग व कयाकिंग, सायकलिंग, फेन्सिंग, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, ज्युडो, कब्बडी, खो-खो, रोईंग, शुटिंग, स्विमिंग, टेबल टेनिस, तायक्वांदो, व्हॉलिबॉल, वेटलिफ्टिंग, व्रेस्टलिंग, वुशू आणि योगा हे 25 क्रिडाप्रकार आहेत.

या विविध प्रकारच्या 25 खेळांमधील पारंगत खेळाडूंना प्रशिक्षक बनण्यासाठी पटियाला (पंजाब) येथील नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्समध्ये जाता यावे, यासाठीची नवी अर्थसहाय्य योजना क्रीडा खात्याने गुरुवारी अ​धिसूचित केलेली आहे.

योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या खुल्या प्रवर्गातील सहा, तर अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातीतील (एसटी) प्रत्येकी एका खेळाडूला या इन्स्टिट्यूटमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे असे क्रिडा खात्यामार्फत जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

तसेच 21 ते 35 वर्षे वयोगटातील खेळाडू योजनेचा लाभ घेऊ शकतात. उमेदवारांच्या निवडीसाठी क्रीडा संचालकांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. अर्जदारांची कागदपत्रे व अटींच्या पूर्ततेचा विचार करून पात्र उमेदवारांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT