Goa Accidents Canva
गोवा

Goa Accidents: 'गोव्यातील भाजप सरकारने चतुर्थी उत्सवात अंधार पसरवला'; अपघातांवरून पाटकर यांचा घणाघात

Amit Patkar: असंवेदनशील असलेल्‍या भाजप सरकारचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आपली खुर्ची वाचवण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीत व्यस्त आहेत अशी टीका

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: गोव्‍यात जे अपघात होत आहेत ते जीवघेण्‍या रस्‍त्‍यांमुळे असून रस्‍त्‍यांच्‍या दुरुस्‍तीकडे सरकार फारसे लक्ष देत नाही, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांनी केला असून या अपघातात जखमी झालेल्‍यांना त्‍वरित उपचार मिळणेही शक्‍य होत नाही. या सर्वांची जबाबदारी आता आरोग्‍यमंत्री आणि वाहतूकमंत्र्यांनी घेऊन त्‍यांनी आपल्‍या पदाचा राजीनामा देणेच योग्‍य आहे, अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली.

Accidents In Goa

काकोडा-कुडचडे येथील रस्‍त्‍यावरील खड्डा चुकविण्‍याच्‍या नादात रविवारी रात्री दोन दुचाकींमध्‍ये झालेल्‍या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले होते. त्‍यांना सुरवातीला दक्षिण गोवा जिल्हा इस्‍पितळात उपचारासाठी आणण्‍यात आले. मात्र, मडगावात त्‍यांच्‍यावर उपचार करणे शक्‍य न झाल्‍याने त्‍यांना गोमेकॉत पाठविण्‍यात आले होते.

या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना पाटकर यांनी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झालेल्‍या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाल्याची बातमी ऐकून मला धक्काच बसला. रविवारी सकाळी काँग्रेस पक्षाने कुडचडेमधील खड्डे माती आणि शेणाने बुजवून प्रवाशांचा धोका कमी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आमचे प्रयत्न कमी पडले. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करत आहे, अशी प्रतिक्रिया पाटकर यांनी व्‍यक्‍त केली.

कुडचडे येथे रविवारी रात्री झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी मी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात पोहोचलो, तेव्हा मला सांगण्यात आले की त्यांना जीएमसीमध्ये हलविण्यात आले आहे. कुडचडे ते मडगाव आणि पुन्हा मडगाव ते जीएमसी असा जखमींना प्रवास करावा लागणे ही दुर्दैवी बाब आहे.

याबाबतीत असंवेदनशील असलेल्‍या भाजप सरकारचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आपली खुर्ची वाचवण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीत व्यस्त आहेत. परिणामी गोव्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी अमित पाटकर यांनी केली.

‘चतुर्थी उत्सवात अनेक कुटुंबांत अंधार’

भाजप सरकारने गोव्यातील सर्व रस्त्यांचे मृत्यूच्या सापळ्यात रूपांतर केले आहे. एका आठवड्यात पाच जणांना जीव गमवावा लागला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गणेश चतुर्थी उत्सवात अनेक कुटुंबात अंधार पसरविला आहे, असा आरोप अमित पाटकर यांनी केला. गोव्यात दररोज सुमारे सात अपघात होत असून दर ३१ तासांत सरासरी एक व्यक्ती जखमी झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. गेल्या आठ महिन्यांत १८६ अपघातांमध्ये १९७ जणांचा मृत्यू झाला, असेही पाटकर यांनी नमूद केले.

‘माविन गुदिन्हो अपयशी’

वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. ते त्यांच्या कर्तव्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. एरव्ही मोठ मोठ्याने बोलणारे मॉविन गुदिन्हो आता मौन बाळगून गप्प आहेत ही लाजिरवाणी गोष्ट आहे. भाजप सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात काँग्रेस पक्ष आता आक्रमक होणार आहे. आम्ही गोव्यातील प्रत्येक गावात पोहोचून भाजप सरकारचे अपयश उघड करू, असा इशारा अमित पाटकर यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: 19 एप्रिलनंतर 'या' राशीसाठी शुभ संकेत! व्यवसाय-नोकरीत प्रगतीची संधी, पण गुंतवणुकीसाठी 'अलर्ट'

Iran Refinery Attack: शस्त्रसंधीला अवघ्या काही तासांतच 'सुरुंग'! इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला; कुवेत आणि यूएईवरही पलटवार

Iran US War Ceasefire: "इराणमध्ये सत्तापालट होणार!" ट्रम्प यांचा मोठा दावा; शस्त्रसंधीनंतर अमेरिकेची अण्वस्त्र तळांवर नजर

Mapusa Raid: म्हापशात मध्यरात्री थरार! ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा घाला, 24 वर्षीय विजय सिंगला रंगेहाथ पकडलं; दोन अल्पवयीन मुलही ताब्यात

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणूक रद्द, उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! निवडणूक अधिसूचना ठरवली रद्दबातल

SCROLL FOR NEXT