high fat milk Dainik Gomantak
गोवा

गोवेकरांना पुन्‍हा मिळणार हायफॅट दूध!

गोवा डेअरीचा निर्णय: महिनाभरात होणार उपलब्‍ध; 2 महिन्‍यांपासून होते बंद

दैनिक गोमन्तक

फोंडा: गेल्या मार्च महिन्‍याच्या शेवटच्या आठवड्यापासून बंद करण्यात आलेले म्हशीचे दूध आता गोवा डेअरी पुन्हा उपलब्ध करून देणार आहे. म्हशीच्या दुधाची देशभर झालेली कमतरता आणि वाढीव दर यामुळे गोवा डेअरीला म्हशीचे अर्थात हायफॅट दूध उपलब्ध करणे कठीण झाले होते. ते आता पुन्हा एकदा महिनाभरात उपलब्ध करण्यासाठी गोवा डेअरीने पावले उचलली आहेत. गोवा डेअरीच्या मार्केटिंग अधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली.

गोवा डेअरीच्या दूध दरात सध्या वाढ झाली आहे. त्यातच म्हशीचे हायफॅट दूधही गोवा डेअरीकडे नसल्याने ग्राहकांना सध्या ‘अमूल’, ‘गोकुळ’ किंवा अन्य दूध डेअऱ्यांवर विसंबून रहावे लागते. मागच्या काळात ऐन मोसमात देशभर हायफॅट दुधाचा तुटवडा जाणवला होता. ज्या राज्यांमध्‍ये हे हायफॅट दूध उपलब्ध होते, त्यांनी दरही वाढविले. हायफॅट दूध खरेदी दरात दर दिवशी बदल होत गेल्याने गोवा डेअरी व्यवस्थापनाने शेवटी हायफॅट म्हशीचे दूध राज्याबाहेरील दूध डेअऱ्यांकडून विकत घेणे बंद केले. त्यामुळे गोवा डेअरीत हायफॅट दुधाचा तुटवडा जाणवू लागला आहे.

आता परिस्थिती बदलली असून बाहेरील राज्यांतील डेअऱ्यांचे दूध दरही स्थिर झाले आहेत. त्यातच दुधाच्या उत्पादनातही काहीअंशी वाढ झाल्‍याने आता गोवा डेअरी हे हायफॅट दूध उपलब्ध करणार आहे. ही डेअरी सर्वसाधारण सरासरी पन्नास हजार लिटरपर्यंत दूध उपलब्ध करते. त्यात गाईच्या दुधाचा जास्त भरणा असतो. गाईच्या दुधाचा वापर दही किंवा अन्य दुग्धजन्य पदार्थ करण्यात अत्यंत कमी होत असल्याने गोमंतकीयांना हायफॅट दुधावरच विसंबून रहावे लागते.

गोवा डेअरीच्या दुधाला राज्यात मोठी मागणी असून दर वाढले तरी दुधाची मागणी कायम आहे. त्यामुळे आता हायफॅट दूध उपलब्ध करण्यासाठी गोवा डेअरीने कार्यवाही सुरू केली आहे. पुढील महिन्यापासून हे हायफॅट दूध रोजच्या प्रमाणे उपलब्ध होईल, अशी माहिती देण्यात आली.

का भासला दुधाचा तुटवडा?

गेल्या पावसाळ्यात महापूर आल्याने बरीच दुभती जनावरे दगावली. त्यातच गोव्याबाहेरील दुधाचे दर सातत्याने वाढत राहिले. शिवाय रशिया आणि युक्रेन या दोन देशांतील युद्धामुळे अरब राष्ट्रांत येणारे युक्रेनचे दूध बंद झाले. परिणामी भारताने अरब राष्ट्रांना दूध पावडर व अन्य दुग्धजन्य पदार्थ निर्यात केल्याने छोट्या डेअऱ्यांना बाहेरील दूध विकत घेणे कठीण बनले. राज्यातील दूध उत्पादकांनी परस्पर म्हशीचे दूध ग्राहकांना विकले. त्यामुळे शेवटी गोवा डेअरीला हायफॅट दुधाची कमतरता जाणवली.

गोवा डेअरीतून म्हशीचे हायफॅट दूध बंद झाल्यास आता दोन महिने झाले आहेत. बाहेरील दुधाचे दर सातत्याने वाढत असल्याने हे हायफॅट दूध उपलब्ध होणे कठीण झाले होते. मात्र ग्राहकांची हायफॅट दुधासाठी मोठी मागणी आहे. आता बाहेरील दुधाचे दरही आटोक्यात असल्याने येत्या महिन्याभरात गोवा डेअरीही हायफॅट दूध उपलब्ध करेल. - दत्ता बुर्ये, गोवा डेअरीचे मार्केटिंग व्यवस्थापक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT