Cold Wave Dainik Gomantak
गोवा

Cold Wave: गोवेकरांनो सावधान! थंडीचा विळखा अजून वाढणार

उत्तरेकडील वाऱ्यांमुळे गोव्यातील किमान तापमान नेहमीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

कडाक्याच्या थंडीच्या विळख्यात सापडले असूनही, उत्तर भारतात पुढील आठवड्यात किमान तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे आणि या शनिवार व रविवारपासून देशाच्या वायव्य भागात तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. वायव्य भारतात 15 आणि 16 जानेवारीला थंडीची लाट अपेक्षित आहे.

वाऱ्याच्या दिशाबदलामुळे गोव्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने म्हटले आहे. "उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे गोव्यातील किमान तापमान नेहमीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. हि स्थिती आणखी एक आठवडा चालू राहणार असून 15 जानेवारीनंतर आणखी 1-2 अंशांची घसरण होण्याची शक्यता आहे,"  असे IMD चे  राहुल एम. म्हणाले.

गोव्यात शुक्रवारी सामान्यपेक्षा -2.6 अंश कमी म्हणजेच 17.8 अंश तापमान नोंदवले गेले. राज्यात कोरडे हवामान होते आणि गोव्यात काही ठिकाणी धुके पडले. “14 ते 17 जानेवारीपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 14 जानेवारीला काही ठिकाणी धुके किंवा उथळ धुके पडण्याची शक्यता आहे. दिवसभरात किमान तापमानात मोठा बदल अपेक्षित नाही," असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT