Gauri Shinde Dainik Gomantak
गोवा

Gauri Shinde: "गोव्यात विमान उतरते आणि सर्व काही जादूसारखं बदलतं"! डियर जिंदगी सिनेमाची दिग्दर्शिका म्हणते 'गोवा उपचारात्मक'

Gauri Shinde Goa Connection: ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘डियर जिंदगी’ सिनेमाची दिग्दर्शिका गौरी शिंदे, ‘कार्मेल कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स फॉर वूमन’मध्ये व्याख्यान देण्यासाठी आली होती.

Sameer Panditrao

किंबर्ली कुलासो

तुम्ही स्वतःला स्त्री समजूच नका, मग पुरुष तुमच्या खिजगणतीतही असणार नाहीत’ हे वाक्य जेव्हा गौरी शिंदे यांनी उच्चारले तेव्हा कॉलेजचे संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेले. ती महिला दिग्दर्शिका असल्यासंबंधीच्या एका प्रश्नाला तिचे ते उत्तर होते.

‘इंग्लिश विंग्लिश’ आणि ‘डियर जिंदगी’ या सिनेमाची दिग्दर्शिका गौरी शिंदे, नुवे येथील ‘कार्मेल कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स फॉर वूमन’मध्ये ‘ब्रेकिंग थ्रू: बी ऑन द ग्लास सिलिंग’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आली होती. विद्यार्थिनींनी तिला करिअर निवडीबद्दल आणि आयुष्यातील स्टिरिओ टाईप तोडण्याबद्दल प्रश्न विचारले आणि या साऱ्या प्रश्नांना तिने उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली.

आपल्या चाहत्यांबरोबर वेळ घालवल्यानंतर आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिल्यानंतर, गोव्याबद्दल बोलण्यासाठी आणि गोव्यात तिला पुन्हा पुन्हा येण्यास का आवडते हे सांगण्यासाठी तिने काही वेळ दिला.

‘गोव्यातील पर्रा हे माझे आवडते ठिकाण आहे. मी तिथे राहिले आहे. या गावात, एक फ्रेंच बाई चालवत असलेल्या एका ठिकाणी मी राहायचे पण कोविड- 19 नंतर ते बंद झाले.’ असे तिने तो काळ आठवून भावूकपणे सांगितले. पुढे बोलताना ती म्हणाली, ‘हे ठिकाण समुद्रकिनाऱ्याजवळ नव्हते आणि तिथे फक्त तीन खोल्या होत्या. मला समुद्रकिनाऱ्याजवळ राहणे फारसे पसंत नाही- अगदी मुंबईमध्ये देखील. मला सी-फेसिंग अपार्टमेंट कधीच नको होता.’

अर्थात गोवा तिला आवडत असला तरी इथं पूर्णपणे स्थायिक होण्याचा विचार तिने केलेला नाही. तिला तिचे काम खूप महत्त्वाचे वाटते. अर्धा वेळ गोव्यात राहून आणि अर्धा वेळ मुंबईत राहून ते करणे शक्य आहे याची जाणीवही तिला आहे.

‘कोविड-१९ च्या साथीनंतर अनेक मुंबईकर गोव्यात स्थलांतरित झाले. आता इथे आल्यावर मला वाटते की मी वांद्र्यातच आहे’. कॉलेजच्या कॉमन रूममधील एका लाकडी स्टूलवर आरामात बसलेली गौरी हसून म्हणते आणि आपले लांब कुरळे केस सहजच अंबाड्यात गुंडाळते.

गोवा गौरीला एक उपचारात्मक जागा असल्यासारखी वाटते. ती म्हणते, ‘मुंबई सामान्यतः व्यावसायिक जीवनाशी निगडित आहे आणि आज प्रत्येकजण त्यांना जे उपचारात्मक वाटते ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘डियर जिंदगी’ या चित्रपटातही एक तरुण मुलीला या स्पर्धात्मक जागेतून बाहेर पडणे किती महत्त्वाचे वाटते हे मला दाखवायचे होते.’

‘त्या अर्थाने गोवा उपचारात्मकच आहे, नाही का? म्हणजे तुम्ही इथं विमानातून उतरता आणि सर्व काही आश्चर्यकारकपणे बदलते.‌ इथल्या हवेमध्ये काहीतरी आहे. कदाचित याचे कारण हे असेल की आम्ही सर्वजण मुंबईमध्ये, एका अतिशय गजबजाट असलेल्या शहरात राहतो.’ अर्थात तिची मुंबईबद्दल तक्रार नाही याचा खुलासाही ती करते कारण तिथेच तर चित्रपट बनतात.‌ 

दक्षिण गोवा हा तिचा आवडता गोव्याचा भाग असला तरी उत्तर गोव्यात मिळणारे अन्न तिला आवडते. ‘मागच्या वेळी उत्तर गोव्यात मी स्वादिष्ट चणक थाळीचा आस्वाद घेतला होता. त्याशिवाय महिलांनी चालवलेल्या बारमध्ये जायला मला आवडते. तिथे काउंटरवर महिला बसलेली असते आणि अशा जागेत सुरक्षितही वाटते.‌ अशा जागा विलक्षण असतात.’

गौरीला गोव्यातील छोट्या ठिकाणी जाऊन खायला आवडते. ‘गोवा इज नेव्हर अबाउट बटर चिकन’ हे शेवटचे वाक्य ती उच्चारते आणि तिच्यासाठी थांबलेल्या मुलींमध्ये जाऊन ती सेल्फीसाठी उभी राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fake Police: तोतया पोलिसांचा सुळसुळाट; भरदिवसा दोघांचे दागिने हातोहात लंपास, ज्‍येष्‍ठांसह महिला 'टार्गेट'वर

Paper Leak Issue: विद्यापीठातील प्रश्‍नपत्रिकांची चोरी उघड; चौकशी समितीचा भौतिकशास्त्राचे प्राध्यापक, डीन, रजिस्ट्रार, कुलगुरूंवर ठपका

Rashi Bhavishya 17 July 2025: प्रवासाचे योग, प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील; मान-सन्मान वाढेल

Delhi Goa Flight: विमानात तांत्रिक बिघाड; दिल्लीतून गोव्याला येत असलेले विमान मुंबईला वळवले

पावसाळी अधिवेशनापूर्वी आमदार विजय सरदेसाई अडचणीत; सभापती तवडकरांबाबत जातीय वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिस तक्रार

SCROLL FOR NEXT