Atal setu  Dainik Gomantak
गोवा

Atal Setu : गोव्यातील अटल सेतूवरुन लाखोंच्या सामानाची चोरी

अटल सेतूवर कायम रहदारी सुरु असते. अशातही ही चोरी चोरट्यांनी कशी केली याचीच सध्या चर्चा सर्वत्र सुरु आहे.

आदित्य जोशी

Atal Setu : राजधानी पणजीला उत्तर गोव्याशी जोडणाऱ्या अटल सेतूबद्दल एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. अटल सेतू पुलावरील 6.21 लाख रुपयांच्या दोन वीजेच्या खांबांच्या साहित्याची चोरी झाली आहे. अटल सेतूवर कायम रहदारी सुरु असते. अशातही ही चोरी चोरट्यांनी कशी केली याचीच सध्या चर्चा सर्वत्र सुरु आहे.

पणजी आणि पर्वरीला जोडणाऱ्या अटल सेतूवर लाखोंच्या सामानाची चोरी झाल्याचं आता समोर आलं आहे. पुलावरील दोन वीजेच्या खांबाच्या साहित्याची लूट चोरट्यांनी केली आहे. या सामानाची किंमत अंदाजे 6.21 लाख असल्याचं बोललं जात आहे. जीएसआयडीसीने याप्रकरणी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पणजी पोलिसांनी गुन्हा नोंद करत याप्रकरणाचा तपासही सुरु केला आहे.

दरम्यान अटल सेतू हा नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन चर्चेत असतो. अटल सेतूवरील वीजखांब उभारणी आणि तेथील विद्युत यंत्रणेबाबत भाजप सरकारने सुमारे 30 कोटी रुपयांचा महाघोटाळा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय बर्डे यांनी केला होता.

तसंच ‘अटल सेतू’चे बांधकाम सुरू असताना सरकारने नेमलेले अभियंते प्रत्यक्ष कामाच्या स्थळी उपस्थित न राहिल्याने केवळ कंत्राटदारावर विसंबून राहिल्यामुळे पुलाची दुरवस्था झाली असून अपघाताच्या घटना घडल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तज्ज्ञ अभियंते असूनसुद्धा अशा घटना कशा घडतात? ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे, असा आरोपही त्यांनी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Board HSSC Result: 12 वीचा निकाल जाहीर! 92.96% विद्यार्थी उत्तीर्ण, यंदाही मुलींनीच मारली बाजी

Goa Accident: नाकेरी-बेतुल येथे भीषण अपघात; 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, भटक्या गुरांचा अडथळा ठरला जीवघेणा

KKR ला दुसरा 'मोठा' झटका! हर्षित राणानंतर आता 'हा' मॅचविनर खेळाडू IPL 2026 मधून बाहेर

Viral Video: 'डायपर'चा असाही वापर! कोल्ड-ड्रिंक थंड ठेवण्यासाठी तरुणाचा 'देसी जुगाड', पाहा कसं बनवलं घरगुती मिनी फ्रीज

पदार्पण असावं तर असं! 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 पदार्पणातच झळकावलं शतक, रचले दोन विश्वविक्रम Watch Video

SCROLL FOR NEXT