Goa Sports News Dainik Gomantak
गोवा

Goa Sports News: राष्ट्रीय स्पर्धेत गोमंतकीयांचा उत्स्फूर्त सहभाग हवा!

Goa Sports News: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : राज्यातील सर्व तालुक्यांच्या प्रवासासाठी मशाल रवाना

दैनिक गोमन्तक

Goa Sports News: राज्यात 37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत आहे. ही केवळ क्रीडापटूंसाठीच नव्हे, साऱ्या गोमंतकीयांसाठी मोठी संधी आहे. त्यामुळे नागरिकांना उत्स्फूर्तपणे सहभाग घेत खेळांचा आनंद लुटावा, असे आव्हान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी केले. स्पर्धेविषयी राज्यभरात जागृती करण्यासाठी मशाल बाराही तालुक्यांत प्रवास करेल.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची मशाल गेल्या आठ सप्टेंबर रोजी प्रज्वलित केली होती. मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी मंगळवारी मशाल राज्यातील सर्व तालुक्यांतील प्रवासासाठी रवाना केली. काणकोण येथून मशालीचा प्रवास बुधवारी सुरू होईल आणि सर्व तालुक्यांतून २२ तारखेला तिसवाडी तालुक्यात मशाल दाखल होईल.

स्पर्धेचे उदघाटन २६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होईल. त्यापूर्वी १९ ऑक्टोबरपासून स्पर्धेतील बॅडमिंटन सामने खेळले जातील.

पर्वरीत झालेल्या मशाल रिले कार्यक्रमास क्रीडा सचिव स्वेतिका सचन, गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक डॉ. गीता नागवेकर, क्रीडा संचालक अरविंद खुटकर यांची उपस्थिती होती. मशाल रिलेचे प्रत्येक तालुक्यात संबंधित उपजिल्हाधिकारी, तसेच राज्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडापटू स्वागत करतील.

गोव्यात ४१ खेळांचे सामने

मुख्यमंत्री म्हणाले की, स्पर्धेत सर्वाधिक ४३ खेळ आहेत. त्यापैकी ४१ खेळ राज्यात होतील. मात्र, सायकलिंग (ट्रॅक रेस) व गोल्फच्या सुविधा राज्यात नसल्यामुळे फक्त हे दोन खेळ दिल्ली येथे घेतले जातील.

स्पर्धा पाहण्यासाठी मैदानावर या!

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, गोव्याला पुन्हा स्पर्धेचे यजमानपद मिळणार नाही. ही संधी एकदाच मिळते. युवकांनी याचा लाभ घ्यावा. शालेय विद्यार्थी, शारीरिक शिक्षण शिक्षक, ग्रामीण भागातील यूथ क्लब यांनी मशाल रिलेत वाटा घ्यावा. स्पर्धेविषयी जनजागृतीत योगदान द्यावे. प्रत्यक्ष मैदानावर येऊन स्पर्धेचा आनंद लुटण्याचा अनुभव अविस्मरणीय असेल.

खेळाची आवड असलेल्या गोमंतकीयांनी आपण किमान एक खेळ मैदानावर येऊन पाहणार याचा निश्चय करावा. विशेषत: साऱ्यांचा सहभाग स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचा भाग बनेल. स्पर्धेचे वेळापत्रक, सामने कुठे होतील हे जाहीर करण्यात येईल.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Canacona Mega Housing Project: देळेत गृहनिर्माण प्रकल्पाला तीव्र विरोध; 15 दिवसांत निर्णय न घेतल्‍यास उपोषणाचा इशारा

Hardik Pandya New Look: हार्दिक पंड्याचा नवा अवतार चर्चेत; मुंडण करून महिका शर्मासोबत श्री वेंकटेश्वर स्वामींच्या चरणी नतमस्तक Watch Video

Santa Cruz BJP Office: बाबूश-रुडॉल्फमध्ये शब्दयुद्ध! सांताक्रुझमधील नवे कार्यालयावरून आरोप-प्रत्यारोप सुरू

खरी कुजबूज: तिकीट अन् राजकीय चर्चा..!

US Shopping Mall Shooting: अमेरिकेत शॉपिंग मॉलमध्ये अंधाधुंद गोळीबार; तिघांचा मृत्यू, पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोर ठार Watch Video

SCROLL FOR NEXT