Gomantak TV Engineers Excellence Award 2024 Announced to Women Cricketers Shikha Pandey and Shekhar Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Gomantak TV Engineers Excellence Award 2024: स्टार महिला क्रिकेटर शिखा पांडे आणि शेखर सरदेसाईंचा होणार सन्मान

Women Cricketers Shikha Pandey and Shekhar Sardesai: गणिताच्‍या भक्‍कम पायावर विकासाची अभेद्य प्रमेय मांडणाऱ्या अभियंत्‍यांचे समाजावर अनंत उपकार आहेत. त्‍याची परतफेड करणे अशक्‍य आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गणिताच्‍या भक्‍कम पायावर विकासाची अभेद्य प्रमेय मांडणाऱ्या अभियंत्‍यांचे समाजावर अनंत उपकार आहेत. त्‍याची परतफेड करणे अशक्‍य आहे; परंतु त्‍यांच्‍या कार्याचा गौरव करून प्रोत्‍साहन देण्‍याचा प्रयत्‍न नक्‍कीच करता येतो. त्‍यासाठीच ‘गोमन्‍तक टीव्‍ही इंजिनिअर्स एक्‍सलन्‍स ॲवॉर्ड २०२४’चे आयोजन करण्‍यात आले आहे. त्‍यात ‘बेस्‍ट गोवन इंजिनिअरिंग ब्रँड’ श्रेणीत शेखर सरदेसाई, तर ‘मनोहर पर्रीकर ऑलराऊंडर ॲवॉर्ड’ महिला क्रिकेटर शिखा पांडे हिला जाहीर करण्‍यात आला आहे.

१५ सप्टेंबरला अभियंता दिनी सायंकाळी ४ वा. कुजिरा-सांताक्रुझ येथील मुष्‍टिफंड संस्थेच्या ‘इंडिशिला’ सभागृहात रंगारंग सोहळा होणार असून, त्‍यात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पुरस्‍कारांचे वितरण होणार आहे. गोमन्तक टीव्ही’ने पडद्यामागील अभियंतारूपी कल्‍पक हातांचा सन्‍मान करण्‍याचे योजून एक आगळेवेगळे व्यासपीठ खुले केले आहे. या कार्यक्रमासाठी राज्‍य सरकारचे महत्त्‍वपूर्ण सहकार्य लाभले आहे.

पुरस्‍कार जाहीर झालेल्‍या मान्‍यवरांचा अल्‍प परिचय

शिखा पांडे हिचा जन्म १२ मे १९८९ रोजी झाला. शिक्षणात तसेच क्रिकेटमध्ये तिने अग्रक्रम राखला. गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. दहावी इयत्तेत सीबीएई अभ्यासक्रमात गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल तिला ‘धिरुभाई अंबानी पुरस्कार’ मिळाला होता. भारतीय हवाई दलातून स्क्वॉड्रन लिडर एटीसी ऑफिसर या पदावरून दहा वर्षांच्या सेवेनंतर शिखा निवृत्त झाली. २०१७ साली तिला हवाई दल प्रमुख यांच्या हस्ते ‘द चिफ ऑफ एअर स्टाफ कमेंडॅशन’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

शेखर सरदेसाई हे ख्‍यातनाम उद्योजक आहेत. ते प्रसिद्ध ‘किनेको’ ग्रुपचे संस्‍थापक व व्‍यवस्‍थापकीय संचालक आहेत. कंपनीचा देशभर विस्‍तार झाला असून हजारो लोकांच्‍या हातांना रोजगार देण्‍याचे लक्ष्‍य कंपनीने साध्‍य केले. अंतराळ उड्डाणासह संरक्षण, रेल्‍वे, दूरसंचार, पवन ऊर्जा क्षेत्रांसाठी लागणारी दर्जेदार सामग्री बनविण्‍यात ‘किनेको’चे मोठे योगदान आहे. सरदेसाई यांनी पणजी अभियांत्रिकी विद्यालयातून ‘फॅब्रिकेशन’ विषयातून शिक्षण पूर्ण केले. कुशल अभियंता म्‍हणून अल्‍पावधीत त्‍यांना ओळख मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT