Anil Khaunte|Gomantak TV Engineering Excellence Award 2024 Dainik Gomantak
गोवा

अभियंत्यांप्रती कृतज्ञता! उद्योगपती अनिल खंवटे यांना ‘जीवन गौरव’; एकूण १६ पुरस्‍कार वितरण होणार

Engineering Excellence Award 2024: राज्‍य सरकारच्‍या सहकार्याने येत्‍या १५ सप्‍टेंबरला ‘गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्ड’चे आयोजन केले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गावापासून विश्‍‍वापर्यंतच्या सर्वांगीण उत्थानासाठी ज्या-ज्या महानुभावांनी हातभार लावला, त्यात अभियंत्यांचा सहभाग लक्षणीय आहे. त्‍यांच्‍याप्रति कृतज्ञता जपत ‘गोमन्‍तक टीव्‍ही’ने राज्‍य सरकारच्‍या सहकार्याने येत्‍या १५ सप्‍टेंबरला ‘गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्ड’चे आयोजन केले आहे. या आनंद सोहळ्यात ख्‍यातनाम उद्योगपती, दानशूर व्‍यक्‍तिमत्त्‍व अनिल खंवटे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात येणार आहे.

‘इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्ड २०२४’साठी ११ विभागांतून नामांकने मागविण्‍यात आली होती. त्‍यामधून होणाऱ्या निवडीसह एकूण १६ पुरस्‍कार देण्‍यात येणार आहेत. मान्‍यवर ज्‍युरींनी निवडलेल्‍या महनीय अभियंत्‍यांची टप्प्याटप्प्याने घोषणा करण्‍यात येणार आहे. अभियंतादिनी म्हणजेच १५ सप्‍टेंबर रोजी सायंकाळी ४ वा. कुजिरा-सांताक्रुझ येथील मुष्‍टिफंड संस्थेच्या ‘इंडिशिला’ सभागृहात पुरस्‍कार वितरण होणार आहे. यावेळी दिग्‍गज मान्‍यवर उपस्‍थित राहतील.

‘गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स’ जीवन गौरव पुरस्‍कारासाठी निवडण्‍यात आलेले उद्योगपती अनिल खंवटे यांनी शून्यातून विश्‍‍व उभारले, अनेक संस्‍था निर्माण केल्‍या. राज्‍याच्‍या सांस्‍कृतिक, आर्थिक विकासात त्‍यांचे अतुलनीय योगदान राहिले आहे.

ख्‍यातकीर्त ‘अल्‍कॉन’चे ते संस्‍थापक आहेत. त्‍यांच्‍या नेतृत्‍वाखाली या आस्‍थापनाने यशस्‍वीपणे तयार केलेले ‘खंवटो मायक्रोफीन’ हे उत्‍पादन महत्त्‍वाचा टप्‍पा ठरले. कुंडई येथील ‘हरित केंद्र’नामक आधुनिक संशोधन प्रकल्‍पाची स्‍थापना त्‍यांच्‍या कल्‍पक दूरदृष्‍टीचा आविष्‍कार ठरला. औद्योगिक कचऱ्यापासून विकसित करण्‍यात आलेली उत्‍पादने मैलाचा टप्‍पा ठरला. आयआयटी गोवा, आयआयटी मुंबई व गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय यासारख्‍या महत्त्‍वाच्‍या संस्‍थांबरोबर हरित केंद्राने यशस्‍वीपणे भागीदारी केली आहे. खंवटे यांना १५ रोजी गौरविण्‍यात येणार आहे.

प्रतिभा, कल्‍पकतेचा आविष्‍कार

१६ एप्रिल १९४४ साली म्‍हापशात जन्‍मलेल्‍या अनिल खंवटे यांनी मुंबई येथील ‘व्‍हीजेटीआय’ या प्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालयातून बांधकाम अभियांत्रिकी पदवी मिळविली. तदनंतर त्‍यांनी चार वर्षे खासगी क्षेत्रात काम करून मौलिक अनुभव मिळविला.

पुढे अनिल खंवटे हे सार्वजनिक बांधकाम खात्‍यात रुजू झाले. ती त्‍यांच्‍या कारकिर्दीची सुरवात होती. पुढे त्‍यांच्‍या दूरदृष्‍टीतून त्‍यांना आपली दिशा पक्‍की कळली. इच्‍छाशक्‍ती, प्रतिभेला शौर्य, शिस्‍त व मेहनतीची जोड लाभली.

त्‍यांनी ‘खंवटे इंजिनिअरिंग’ची स्‍थापना केली तेव्‍हा स्वतःवरचा आणि राज्‍याप्रति असलेला विश्‍‍वास व त्‍यांची इच्‍छाशक्‍ती, हेच त्‍यांचे बलस्‍थान होते.

बांधकाम क्षेत्रापासून अभियांत्रिकी उत्‍पादन निर्मिती, आतिथ्य सेवा, निर्यात या क्षेत्रांत त्‍यांचा व्‍यवसाय वृद्धिंगत झाला आहे.

अनेक मान-सन्‍मान

उद्योगरत्‍न पुरस्‍कार (इकॉनॉमिक स्‍टडीजतर्फे), २. राजीव गांधी एक्‍सलन्‍स पुरस्‍कार (१९९३, शिरोमणी इन्स्टिट्यूट-नवी दिल्‍ली), ३. सामाजिक विकास जीवन गौरव पुरस्‍कार (२००८, आरोग्‍य आणि शिक्षण विकास संस्‍था), ४. प्रतिभावान उद्योजकता पुरस्‍कार (गोवा राज्‍य औद्योगिक संघटना-२०१०), पोर्तुगाल राष्‍ट्राध्‍यक्षांच्या हस्‍ते खास गौरव. (२०१०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT