Dainik Gomantak
Dainik Gomantak  Dainik Gomantak
गोवा

गोमन्तक सुपर फॅमिली; उद्यापासून प्रश्‍नमंजूषा स्पर्धा

दैनिक गोमन्तक

पणजी: वाचनाचा, माहितीचा ‘सहकुटुंब’ आस्वाद घेणाऱ्यांसाठी दै.‘गोमन्तक’ने एक खास पर्वणी आणली आहे. ‘गोमन्तक’मध्ये सुरू झालेल्या ‘सुपर फॅमिली’ या विशेष सदराबरोबर आता बक्षिसांची लयलूटही असणार आहे. खासम खास ‘ गोमन्तक सुपर फॅमिली प्रश्नमंजूषा स्पर्धा’ १३ जुलैपासून सुरू होत आहे. तब्बल लाखो रुपयांची बक्षिसांची लयलूट या योजनेत असणार आहे. लॅपटॉपचे बंपर बक्षीस (संख्या 2) हे विशेष आकर्षण आहे

(Gomantak Super Family; Quiz competition from tomorrow)

वाचकांच्या खास आग्रहावरून ‘गोमन्तक’ने ‘सुपर फॅमिली’ सदराच्या माध्यमातून महितीचा आणि बक्षिसांचाही खजिना भेटीला आणला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी खास माहिती, ज्ञान, मनोरंजन अशा गोष्टी; मूल्यमंत्र, कोडी, सेलिब्रिटींच्या कुटुंबांची माहिती रंजक माहिती त्यात आहे. हे सदर वाचून, प्रश्नांच्या उत्तराचे कूपन (योजनेसाठी खास प्रसिद्ध होणाऱ्या पानावर) चिकटवून ती जवळच्या ‘गोमन्तक’ कार्यालयात जमा करायची आहेत. त्यानंतर लकी ड्रॉ पद्धतीने बक्षिसे मिळणार आहेत. याबाबत सविस्तर सूचना नंतर प्रसिद्ध केल्या जातील. ही योजना शंभर दिवस सुरू राहणार आहे. या कालावधीत कोणतीही 80 प्रश्‍नांची उत्तरे लिहून सदरचे कात्रण चिकटवणे आवश्‍यक आहे.

गोव्यातल्या सर्वांसाठी ही योजना खुली राहणार आहे. या स्पर्धेची 8 नोव्हेंबर 2022 रोजी सांगता होईल. 20 नोव्हेंबर पर्यंत या प्रवेशिका ‘गोमन्तक’ कार्यालयात किंवा शाळेत ठेवलेल्या ‘गोमन्तक ड्रॉप बॉक्स’मध्ये जमा करावी. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधावा. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला हमखास बक्षीस आहे. सहभागी स्पर्धकाला स्कूल बॅग मिळणार आहे. तेव्हा गेट रेडी, आजच आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याशी संपर्क साधून ‘गोमन्तक’ अंक सुरू करा आणि व्हा सज्ज, ज्ञानाचा सहकुटुंब आस्वाद घ्यायला आणि बक्षिसांची संधी साधायला!

योजनेच्या माहितीसाठी संपर्क

 अनिल शेलार ९८८११०२००५

 भारत पवार (तिसवाडी, वास्को) ९८८१०९९२४७

 संजय पाटील (फोंडा, सत्तरी) ९९२२९०३०२०

 मारुती वाघमारे (सासष्टी, केपे, सांगे, काणकोण) ८४२१३६९३३६

 राजेश दापले (बार्देश, पेडणे, डिचोली) - ९८५०९०६०८६

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT