Gomantak Bhandari Samaj Dainik Gomantak
गोवा

Bhandari Samaj: भंडारी समाजाच्या नेत्‍यांकडून मोर्चेबांधणी सुरू! एकसंघ करण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न सुरू; लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

Gomantak Bhandari Samaj Election: भंडारी समाजाला छत्राखाली आणण्‍यासाठी प्रयत्‍न करीत असलेल्‍या आणि विविध पक्षांमध्‍ये सहभागी असलेल्‍या नेत्‍यांनी आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Sameer Panditrao

पणजी: राज्‍यातील सर्वांत मोठ्या भंडारी समाजाला एका छत्राखाली आणण्‍यासाठी प्रयत्‍न करीत असलेल्‍या आणि विविध राजकीय पक्षांमध्‍ये सहभागी असलेल्‍या नेत्‍यांनी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

त्‍यासाठी भंडारी समाजातील सर्वच लोकप्रतिनिधींचा येत्‍या १२ ऑक्‍टोबरला हरवळे येथील रुद्रेश्‍‍वर मंदिरात गौरव करण्‍याचाही निर्णय त्‍यांनी घेतला आहे. याबाबत रविवारी हरवळेत घेतलेल्‍या पत्रकार परिषदेला माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, दिलीप परुळेकर, महादेव नाईक, माजी आमदार किरण कांदोळकर, ‘आप’चे राज्‍य निमंत्रक अमित पालेकर यांच्‍यासह इतर नेते उपस्‍थित होते.

राज्‍यात भंडारी समाजाची लोकसंख्‍या सर्वाधिक आहे. प्रत्‍येक निवडणुकीत या समाजाचे मतदार महत्त्‍वपूर्ण भूमिका निभावत असतात. त्‍यामुळेच विविध पक्षांत कार्यरत असलेल्‍या भंडारी नेत्‍यांनी संघटित होत समाजाला एकसंघ करण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न सुरू केले आहेत.

निवडणुकीत उमटू शकतात पडसाद!

१२ ऑक्‍टोबरचा कार्यक्रम हा भंडारी समाजातील लोकप्रतिनिधींच्‍या गौरवासाठी आहे. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. समाजाच्‍या भल्‍यासाठीच आम्‍ही विविध पक्षांचे नेते एकत्र आलो आहोत. पुढील काळातही असे अनेक कार्यक्रम घेण्‍यात येतील. भंडारी समाज हा राज्‍यातील सर्वांत मोठा समाज असल्‍यामुळे अशा कार्यक्रमांचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीतही उमटू शकतात, असे अमित पालेकर यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT