Bhandari Samaj  Dainik Gomantak
गोवा

Bhandari Community In Goa: गैरव्‍यवहार, लूट सुरू; निवडणूक कधी घेणार? भंडारी नेते संतप्त

Goa Bhandari Samaj: कार्यकारिणी समितीच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक; अध्यक्ष अशोक नाईक यांनी उत्तर न देताच घेतला काढता पाय

गोमन्तक डिजिटल टीम

Gomantak Bhandari Samaj Meeting

पणजी: गोमंतक भंडारी समाजाच्या केंद्रीय कार्यकारिणी समितीच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी पणजीत आज बैठक बोलावली होती. या बैठकीवेळी समाजाच्या उपस्थित सदस्यांनी समाजाची सर्वसाधारण सभा तसेच निवडणूक कधी घेणार हे आधी सांगा, अशी विचारणा करत समितीला धारेवर धरले.

या विषयावरून बैठकीत प्रचंड गदारोळ माजला. मात्र, समितीने निवडणुकीसंदर्भात कोणतेच स्पष्टीकरण न दिल्याने सदस्य संतापले आणि त्यांनी बैठक बंद पाडली. वातावरण अधिकच तंग झाल्याने समितीच्या सदस्यांवर या बैठकीतून काढता पाय घेण्याची वेळ आली. या बैठकीवेळी पोलिस संरक्षण मागवून घेण्यात आले होते.

गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी केंद्रीय कार्यकारिणी समिती, तालुका समिती सदस्य तसेच महिला समिती सदस्यांची एकत्रित बैठक आज दुपारी ३ वाजता पणजी येथे गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात बोलावली होती. या बैठकीला समिती सदस्यांपेक्षा समाजाचे सदस्यच मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाच्या केंद्रीय कार्यकारिणी समितीला निवडणुकीसंदर्भात त्यांनी जाब विचारला.

पूर्वपीठिका अशी...

केंद्रीय कार्यकारिणी समितीने उपेंद्र गावकर यांनी बोलावलेली समाजाची बैठक आणि निवडणुकीला न्यायालयात आव्हान दिले होते. या आव्हान अर्जावरील सुनावणीवेळी न्यायालयाने दोन्ही पक्षांनी एकत्रित बसून निवडणुकीसंदर्भात तोडगा काढण्यास मुभा दिली होती. मात्र, समितीने त्याला संमती दिली नाही.

समाजाचा विकास खुंटण्यास ही समिती कारणीभूत आहे. या समितीला निवडणूक नको आहे. त्यांना पुन्हा मागीलप्रमाणे मुदत वाढवून घ्यायची आहे. समितीचा कार्यकाळ ३ ऐवजी ५ वर्षे करायचा आहे. त्यामुळेच हा खटाटोप सुरू आहे, असा आरोप यावेळी काही सदस्यांनी केला.

न्यायालयात आज सुनावणी

गोमंतक भंडारी समाजाच्या कारभारामधील गैरव्यवहारप्रकरणी पणजी पोलिसांत फसवणुकीचा दाखल असलेल्या गुन्ह्यात अशोक नाईक, देवानंद नाईक, कृष्णकांत गोवेकर, झोगसू नाईक, फक्रू पणजीकर यांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन दिला होता. त्यांच्या या अर्जावरील सुनावणी (ता. २६) सत्र न्यायालयात आहे. त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर ते पणजी पोलिसांत चौकशीसाठी हजर राहिले होते.

समाजाची अधोगती; मंत्री, आमदारही घटले

समितीचे माजी सरचिटणीस उपेंद्र गावकर यांनी बेकायदा बोलावलेली आमसभा व निवडणूक याला न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे निवडणूक प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर समाजाच्या नियमावलीनुसार निवडणूक घेऊ. आता निवडणूक घोषित केली तर न्यायालयाचा अवमान होऊ शकतो, असे अशोक नाईक यांनी सांगण्याचा प्रयत्न केला.

मात्र, उपस्थित समाजाच्या सदस्यांनी गोंधळ घातला. कायद्याची भाषा सांगून धमकावण्याचा प्रयत्न करू नका. २०२१ मध्ये कोविड काळात समाजाच्या केंद्रीय कार्यकारिणी समितीसाठी ऑनलाईन निवडणूक घेण्यात आली ती नियमावलीनुसार होती का, असा प्रश्‍न त्यांनी केला.

एकजूट नसल्यानेच गेल्या काही वर्षांत या समाजाची अधोगती झाली आहे. राज्यात या समाजाची लोकसंख्या अधिक आहे. यापूर्वी समाजाचे ८ ते १० आमदार असायचे. आता ही संख्या ४ वर आली असून दोनच मंत्री आहेत. त्यामुळे भंडारी समाजाचा विकास खुंटला आहे, असे मत यावेळी काहीजणांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT