Bhandari Community Dainik Gomantak
गोवा

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Gomantak Bhandari Samaj: अशोक नाईक गटाने प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयातून स्थगिती आदेश मिळवला आहे. त्याला गावकर यांनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर आज म्हापसा येथे सुनावणी झाली. मात्र, ती ९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: वास्को येथे होणारी गोमंतक भंडारी समाजाची आमसभा वादळी ठरणार आहे. या आमसभेत विद्यमान अध्यक्ष अशोक नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी विरोधी गटाने पुरेशी तयारी केली आहे. ते मोठ्या संख्येने आमसभेत सहभागी होणार आहेत. याआधी पणजीत घेतलेल्या तालुका समित्यांच्या बैठकीतही निवडणूक कधी घेणार या प्रश्नांची सरबत्ती नाईक यांच्यावर झाल्याने त्यांना बैठकीतून निघून जावे लागले होते.

निवडणुकीत सरचिटणीसपदी निवडून आलेल्या उपेंद्र गावकर यांनी बोलावलेल्या समाजाच्या आमसभेला अशोक नाईक गटाने प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयातून स्थगिती आदेश मिळवला आहे. त्याला गावकर यांनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर आज म्हापसा येथे सुनावणी झाली. मात्र, ती ९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

याशिवाय अशोक नाईक यांची समिती बेकायदेशीर असल्याने घेण्यात येणाऱ्या आमसभेत त्यांना महत्त्वाचे निर्णय घेण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी करणारी याचिका संस्था नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली आहे. त्यावरही ११ रोजी सुनावणी होणार आहे. यामुळे अशोक नाईक यांचा आमसभा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

निवडणुकीच्या घोषणेची शक्यता

अशोक नाईक गटाने नोव्हेंबरमध्ये समितीची मुदत संपते असे गृहित धरून निवडणूक घेण्याची तयारी केली आहे. उद्याच्या आमसभेत त्याविषयीची घोषणा केली जाऊ शकते. ही निवडणूक न करता समाजाच्या ऐक्यासाठी पदांवर नियुक्त्या केल्या जाव्यात अशी सूचना माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी केली होती. त्यावरही समाजाच्या विविध बैठकांत विचार करण्यात आला. मात्र, विद्यमान समितीच्या मनमानीला चाप लावण्यासाठी निवडणूक लढवणे हाच एकमेव पर्याय असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

रवी नाईक यांच्या भूमिकेकडे लक्ष

कृषिमंत्री रवी नाईक यांनी या प्रश्नी लक्ष घातले आहे. भंडारी समाजाचा स्नेहमेळावा त्यांनी आयोजित करून आपल्यामागे समाज असल्याचे चित्र सर्वांसमोर आणले आहे. सध्या तेच एकमेव असे समाजाचे निर्विवाद नेते आहेत. त्यांची मर्जी अशोक नाईक गटावर राहिली नसल्याचे दिसून येते. मध्‍यंतरी समांतर अशी दुसरी समाज संघटना स्थापन करण्याचा विषयही त्यांच्यासमोर मांडण्यात आला होता. त्यासाठी आर्थिक बळ देण्याची तयारीही त्यांनी केली होती. मात्र, त्यातून समाजातील दुही कमी होणार नसल्याने गोमंतक भंडारी समाज हीच संघटना निवडणुकीच्या माध्यमातून ताब्यात घेण्यावर तूर्त मतैक्य झाले आहे. या साऱ्याला रवी नाईक यांचा आशीर्वाद असल्याचे सांगण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT