National Surfing Competition  Dainik Gomantak
गोवा

शुगर बनारसे, सोफिया शर्मा यांना राष्ट्रीय सर्फिंग स्पर्धेत सुवर्णपदक

Kishor Petkar

पणजी : गोव्याची सोळा वर्षीय शुगर बनारसे आणि चौदा वर्षीय सोफिया शर्मा यांनी राष्ट्रीय खुल्या सर्फिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. स्पर्धा मंगळूरजवळील पानंबूर बीचवर झाली. या दोघींच्या सफल कामगिरीमुळे गोवा पुन्हा एकदा भारतीय सर्फिंग नकाशावर आल्याचे मत प्रशिक्षक एडी रॉड्रिग्ज यांनी व्यक्त केले.

भारतीय सर्फिंग महासंघ आणि मंत्रा सर्फ क्लब यांच्यातर्फे स्पर्धा घेण्यात आली होती. शुगर हिने महिलांत, तर सोफियाने १६ वर्षांखालील मुलींत अव्वल कामगिरी बजावली. गतवर्षी शुगरला स्पर्धेत रौप्यपदक मिळाले होते.

मोरजी-पेडणे येथील ऑक्टोपस सर्फ स्कूलमध्ये शुगर व सोफिया यांना प्रशिक्षक एडी रॉड्रिग्ज यांचे मार्गदर्शन लाभते. त्यांनी सांगितले, की ‘‘सोफियाची ही पहिलीच राष्ट्रीय स्पर्धा होती, शुगरने राष्ट्रीय पातळीवर दुसऱ्यांदा पदक जिंकले.

ही कामगिरी अतिशय महत्त्वाची आहे. त्यांच्या या पदकामुळे गोव्याला भारतीय सर्फिंग नकाशावर आणण्यास मदत झाली आहे. या कामगिरीमुळे अधिकाधिक मुलींना सर्फिंगसाठी प्रोत्साहन मिळेल.’’ मंगळूरमधील स्पर्धेत देशातील सर्वोत्तम सर्फर्स सहभागी झाले होते, त्यामुळे स्पर्धेचे महत्त्व वाढले होते, असेही एडी यांनी नमूद केले.

महिला खुल्या गटात शुगरने तमिळनाडूच्या सृष्टी सेल्वम, कर्नाटकच्या सिंचना गौडा यांना मागे टाकले. या स्पर्धेत तमिळनाडूने सर्वाधिक सहा पदकांसह पहिला क्रमांक मिळविला. पाच पदकांसह कर्नाटकला दुसरा, तर दोन सुवर्णपदकांसह गोव्याला तिसरा क्रमांक मिळाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT