Gokarn Partgali Math Dainik Gomantak
गोवा

Partgali Math Rama Statue: तन में राम, रोम रोम में राम रे! पर्तगाळ मठाकडे भाविकांचा ओघ, अनुयायांचे जत्थे काणकोणात

Gokarn Partgali Math: येथील श्रीरामाच्या ७७ फूट उंचीच्या प्रतिमेशेजारी उभे राहून सेल्फी तसेच श्रीरामाचे फोटो काढण्यासाठी प्रत्येक भाविक क्षणभर या परिसरात थबकत होता.

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण : गोकर्ण-पर्तगाळ मठात भाविकांचा ओघ वाढतच असून तिसऱ्यादिवशीही मठ परिसरात अनुयायांची मोठी गर्दी दिसून आली. गोव्यातील मठानुयायांबरोबरच अन्य राज्यांतील भाविकांनी मठ परिसरात गर्दी करून आध्यात्मिक अनुभव घेतला.

येथील श्रीरामाच्या ७७ फूट उंचीच्या प्रतिमेशेजारी उभे राहून सेल्फी तसेच श्रीरामाचे फोटो काढण्यासाठी प्रत्येक भाविक क्षणभर या परिसरात थबकत होता. कर्नाटकातील बंगळुरू, मंगळूर, म्हैसूर या प्रमुख शहरांबरोबरच कुमठा, उडुपी, बेळगाव, होन्नावर, अंकोला व अन्य ग्रामीण भागांतून भाविक खासगी वाहनांनी मोठ्या संख्येने येत होते.

चिंतना रामायण नृत्य....

शुक्रवारी माधव नारायण सभामंडपात बालश्री पुरस्कारप्राप्त विद्वान सुजय शानभाग आणि साथींनी चिंतना रामायण नृत्य सादर केले. त्यांनी कर्नाटक राज्योत्सवात त्यांनी भाग घेतला होता. त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. या नृत्यातील प्रमुख कलाकार सुजय शानभाग यांना मठाधीश श्रीमद् विद्याधीश तीर्थ स्वामींच्या हस्ते गौरविण्यात आले.

श्रीराम पट्टाभिषेक साजरा

गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठात आज श्रीराम पट्टाभिषेक हजारो भाविकांच्या उपस्थित साजरा झाला. त्याचप्रमाणे सीताराम कल्याणोत्सवही साजरा झाला. श्रीमद् विद्याधीश स्वामींनी या पट्टाभिषेकाचा धार्मिक विधी केला.त्यानंतर मठ जीर्णोद्धार कार्यात योगदान दिलेल्या कारसेवकांची श्रीमद् विद्याधीश तीर्थ स्वामींच्या हस्ते गौरव करण्यात आला. उद्या (ता.३०) ४.३० ते ७ पर्यंत श्रीराम प्रतिमा प्रतिष्ठा होणार आहे. त्यानंतर सेवा दिलेल्या दात्यांचा स्वामींच्या हस्ते गौरव होणार आहे.

तलवाडा-वेरोडा-कुंकळ्‍ळी येथील श्री शांतादुर्गा वेर्डेकरीण देवीचा वार्षिक कालोत्सव शुक्रवार, २८ नोव्‍हेंबरपासून सुरू झाला असून रविवार, ३० नोव्हेंबर रोजी कालोत्‍सवानिमित्त पहाटे श्रींची ब्रह्मरथातून भव्य मिरवणूक झाल्‍यानंतर आरती व प्रसादाने उत्सवाची सांगता हाेणार आहे.

शुक्रवार, २८ व शनिवार, २९ रोजी दिवसभर धार्मिक विधी करण्‍यात आले. शुक्रवारी देवीची अष्टदिपालक उत्सव रथातून भव्य मिरवणूक काढली तर शनिवार, २९ रोजी विनोदी नाटक ‘लटर फटर घंच्येकटर’, रात्री ११.३० वा. श्रींची विजय रथातून भव्य मिरवणूक काढली. रविवार, ३० रोजी सकाळी अभिषेक, आरती, रात्री १० वा. देणगी कुपनाचा निकाल, नंतर रात्री १०.३० वा. ‘ऑर्केस्ट्रा ओम मेलोडीज’, रात्री जागर, पहाटे श्रींची ब्रह्मरथातून भव्य मिरवणूक, आरती, प्रसाद हाेईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT