गांधी जयंती सोहळ्यादरम्यान मान्यवर  Dainik Gomantak
गोवा

Goa:'भाजप सरकार उलथवून टाकण्यासाठी गांधी मार्गाचा अवलंब करा'

दांडी मार्चनंतरच तत्कालीन ब्रिटिश सरकारने मिठाचे कायदे मोडले गेले आणि त्याच धर्तीवर, लोकांनी संघटित होऊन सध्याच्या भाजप सरकारशी लढले पाहिजे.असे आमोणकर गांधी जयंती निमित्त बोलत होते.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: गोवा काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर (Sankalp Amonkar)यांनी भ्रष्ट, जनविरोधी आणि अत्याचाराच्या सरकारला एकत्रितपणे उठाव आणि उलथून टाकण्यासाठी लोकांनी महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi)पावलांचे अनुसरण केले पाहिजे.

आमोणकर गांधी जयंती सोहळ्यादरम्यान बायणा येथील मुरगाव मतदार संघ कार्यालयात बोलत होते.गांधीजींच्या तसबिरीला हार अर्पण करून अभिवादन केले व गांधी जयंती साजरी केली.

दरवर्षी गांधी जयंती साजरी करतो पण भ्रष्टाचाराविरोधात (corruption)लढण्याची त्यांची विचारधारा पुढे नेणे महत्वाचे आहे, बंड करून अत्याचार आणि अहिंसेद्वारे निषेध. गांधीजी नेहमी म्हणाले की, मानवतेची सेवा ही ईश्वराची सेवा आहे आणि अत्याचार सहन करणारी व्यक्ती तितकीच जबाबदार आहे.

LPG सिलेंडर दरवाढ, इंधन दरवाढ, भाजीपाला आणि किराणा मालाची दरवाढ आणि लोकांचे जगणे कठीण करणे, विशेषत: साथीच्या काळात भाजपने गोव्याचे जीवन कसे दयनीय केले आहे हे आम्ही पाहिले आहे. स्थानिकांचा कडक विरोध असूनही सरकार लोकविरोधी प्रकल्पांना कसे पुढे ढकलते आहे ते पाहिले. वेळ आली आहे, तेव्हा लोकांनी गांधींच्या पावलांवर पाऊल ठेवून निदर्शने करून अन्यायाविरुद्ध आवाज उठविला पाहिजे.

दांडी मार्चनंतरच तत्कालीन ब्रिटिश सरकारने मिठाचे कायदे मोडले गेले आणि त्याच धर्तीवर, लोकांनी संघटित होऊन सध्याच्या भाजप सरकारशी लढले पाहिजे. मला खात्री आहे की या वेळी, आम्ही बंडखोरी करू, भाजप सरकार उलथवून टाकण्यासाठी आणि लोकांच्या भल्यासाठी काम करणाऱ्या योग्य नेत्यांची निवड करण्यासाठी एकजुटीने लढा देऊ असे ते शेवटी म्हणाले.यावेळी नगरसेविका श्रद्धा आमोणकर, योगिता पार्सेकर, गोवा प्रदेश काँग्रेस समिती मुरगाव गटाध्यक्ष महेश नाईक आणि इतरांनीही आपले विचार मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT