Mahadayi Water Issue Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Issue: 'म्हादई'प्रश्नी मंत्री सुभाष शिरोडकरांनी घेतली केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट

कर्नाटकच्या डीपीआरची मंजुरी मागे घेण्याबाबत निवेदन

Akshay Nirmale

Mahadayi Water Issue: केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकच्या नव्या डीपीआरला दिलेल्या मंजुरीनंतर गोव्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे म्हादई नदीच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान, या प्रश्नावर राज्यातील सर्व मंत्र्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. तत्पुर्वी राज्याचे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी भोपाळ येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेतली.

मंत्री सुभाष शिरोडकर हे सध्या भोपाळमध्ये आहेत. भोपाळमध्ये 'वॉटर व्हिजन 2047' या नावाने पहिली परिषद होत आहे. या परिषदेत देशातील सर्व राज्यांचे मंत्री सहभागी झाले आहेत. याच परिषदेवेळी सुभाष शिरोडकर यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेतली.

शिरोडकर यांनी शेखावत यांना निवेदन दिले आहे. त्यात केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकच्या नव्या डीपीआरला दिलेल्या तांत्रिक मंजुरीला त्यांनी विरोध दर्शविला आहे. तसेच या प्रकरणात गोव्याची भूमिका त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या कानावर घातल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT