Goa Carnival Dainik Gomantak
गोवा

मडगाव कार्निव्हलमध्ये यंदा ‘गोव्याची परंपरा’

कार्निव्हल परेड 27 रोजी मडगावात

दैनिक गोमन्तक

सासष्टी: यंदा मडगावची कार्निव्हल परेड 27 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेतीन वाजल्यापासून जिल्हा न्यायालय ते बोरकर सुपर स्टोअर्स या दर वर्षीच्या रस्त्यावरुन आयोजित करण्याचा निर्णय आज (बुधवारी) कार्निव्हल (Carnival Festival) समितीच्या पहिल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मडगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी दिली.

निवडणुकीमुळे (Goa Election 2022) आचारसंहिता लागू असल्याने नगरपालिका मंडळाचा आयोजनात सहभाग नसेल, असे ते म्हणाले. त्यांच्याच अध्यक्षतेखाली कार्निव्हल आयोजन समितीची निवड करण्यात आली असून, नगरपालिका अभियंता मनोज आर्सेकर सचिव व सहाय्यक अभियंता विशांत नाईक हे खजिनदार असणार आहेत. यंदा मडगावात (Margao) चार दिवस कार्निव्हल साजरा केला जाणार असून, ‘गोव्याची परंपरा’ हा विषय असेल. चार दिवस पारंपरिक नृत्य व इतर मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, असे आग्नेल फर्नांडिस यांनी सांगितले.

7 लाख 35 हजारांची बक्षिसे

यंदा कार्निव्हल परेडमध्ये भाग घेणाऱ्या चित्ररथ व इतर कलाकारांना मिळून 7 लाख 35 हजार रुपयांची बक्षिसे प्रायोजित करण्यात आली आहेत. शिवाय यंदाचा कार्निवाल उत्सव ‘कोविड-19’ साठी जी सरकारने मार्गदर्शक नियम घालून दिले आहेत त्यांचे पालन करूनच साजरा केला जाईल, असे फर्नांडिस यांनी सांगितले. कार्निव्हल परेडसाठी गोव्याचा फुटबॉलपटू अर्जुन पुरस्कार व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ब्रम्हानंद शंखवाळकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाईल, असे आग्नेल फर्नांडिस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT