37th National Games Goa  Dainik Gomantak
गोवा

National Games Goa: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यजमान गोव्याचे देदीप्यमान यश, ‘टॉप टेन’मध्ये स्थान

National Games Goa: 27 सुवर्णांसह एकूण 91 पदके

दैनिक गोमन्तक

गोव्यात बुधवारी पहाटे भरपूर पाऊस पडला. त्यामुळे 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अंतिमपूर्व दिनी होणाऱ्या सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, नंतर वातावरण बदलले. यॉटिंग शर्यती खराब हवामानामुळे रद्द कराव्या लागल्या, तरी आकाश स्वच्छ झाल्यानंतर हॉकी, बीच हँडबॉल, सायकलिंग, नेमबाजी आदी आऊटडोअर स्पर्धा रंगल्या, तसेच नवे विजेते गवसले.

या पार्श्वभूमीवर यजमान गोव्याने बॉक्सिंग, यॉटिंग, स्क्वे मार्शल आर्ट या खेळांत सुवर्णपदकांची लयलूट करत देदीप्यमान यश संपादन केले. 27 सुवर्णांसह 91 पदके जिंकत गोव्याने ‘टॉप टेन’मध्ये स्थान पटकावले. अंतिम पूर्वदिनी गोव्याने 15 सुवर्ण, 15 रौप्य आणि 10 ब्रॉंझ, अशी एकूण 40 पदके जिंकली.

सुवर्ण जिंकण्यासाठी अमेरिकेतून गोव्यात

अमेरिकेतील न्यूयॉर्कस्थित गोव्याची महिला स्क्वॉश खेळाडू आकांक्षा साळुंखे ही ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनिमित्त खास राज्यात आली आणि तिने सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली.

गोव्याचे पदकविजेते खेळ

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सेपॅक टॅक्रो, स्क्वे मार्शल आर्ट, बॉक्सिंग, तायक्वांदो, यॉटिंग, पेंचाक सिलाट, मॉडर्न पेंटॅथलॉन, स्क्वॉश, योगासन हे खेळ सुवर्णपदक विजेते ठरले. शिवाय जलतरण, वुशू, नेटबॉल, वेटलिफ्टिंग, बीच फुटबॉल, स्नूकर, ॲथलेटिक्स या खेळांतही गोव्याने पदके जिंकली.

भावंडांचे सोनेरी यश

दोना पावला येथील हवाई बीचवर यॉटिंग स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी खराब हवामानामुळे एकही शर्यत झाली नाही. मात्र, मंगळवारपर्यंतच्या एकंदरीत कामगिरीच्या आधारे ‘आयक्यू फॉईल’मध्ये कात्या आणि डेन या कुएल्हो भावंडांनी प्रत्येकी एक सुवर्ण जिंकले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भावंडांनी पदके जिंकण्याची ही कामगिरी गोव्यासाठी आगळी ठरली. त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

पहिले सुवर्ण मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये

गोव्याला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये मिळाले. नेत्रावळी-सांगे येथील बाबू गावकर याने पुरुषांच्या लेझर रन प्रकारात अव्वल कामगिरी नोंदवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT