Pankaj Narvekar Climbs Mount Everest Dainik Gomantak
गोवा

Goa's Pankaj Narvekar Climbs Mount Everest: ऐतिहासिक! माऊंट एव्हरेस्ट सर करणारा पंकज ठरला पहिला गोमन्तकीय

Pankaj Narvekar Climbs Mount Everest: पंकजची कामगिरी राज्यातील तरुण गिर्यारोहकांना प्रेरणा देईल, अशा शब्दात मुख्यमंत्री सावंत यांनी पंकजला शुभेच्छा दिल्या

Pramod Yadav

Goa's Pankaj Narvekar Climbs Mount Everest

जगातील सर्वांत उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टला गवसणी घालणारा पंकज नार्वेकर पहिला गोमंतकीय गिर्यारोहक ठरला. त्याने 21 मे रोजी ऐतिहासिक कामगिरी बजावली.

पंकज 41 वर्षीय असून राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात साहाय्यक अभियंतापदी कार्यरत आहे.

पंजकची 13 वर्षीय मुलगी गुंजन नार्वेकर ही सुद्धा गिर्यारोहक असून गतवर्षी बाप-लेकीने नेपाळमधील एव्हरेस्ट बेस कँप गाठण्याचा पराक्रम साधला होता.

या कँपवर जाणारी सर्वांत युवा गोमंतकीय हा मान गुंजनला मिळाला होता. प्राप्त माहितीनुसार, माऊंट एव्हरेस्ट यापूर्वी एकाही गोमंतकीय गिर्यारोहकाने सर केले नव्हते.

पंकज नार्वेकर एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहिले गोमन्तकीय ठरल्याने गोव्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे! पंकजचे हार्दिक अभिनंदन आणि त्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. ही कामगिरी राज्यातील तरुण गिर्यारोहकांना प्रेरणा देईल, अशा शब्दात मुख्यमंत्री सावंत यांनी पंकजला शुभेच्छा दिल्या आहेत.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी देखील पंकजचे अभिनंदन करत, त्याला शुभेच्छा दिल्या. आलेमाव यांनी पंकजला गोवा सरकारने बक्षीस देण्याची गरज असल्याचे म्हणत, त्याला योग्य मान देण्याची मागणी मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT