Goa CM Pramod Sawant DIP | Goa CM
गोवा

Goa Startups: गोव्यातील IT क्षेत्रात 'नारी शक्ती'चा डंका; 50 टक्के स्टार्टअप्सचे महिला करतायेत नेतृत्व

Women Power In Goa Startups: राज्य सरकार आयटी क्षेत्रातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देत आहे, त्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात सध्या ६२४ स्टार्टअप्स कार्यरत आहेत. त्यातील सुमारे ५० टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली चालवली जात आहेत, ही राज्यासाठी भूषणावह बाब असल्याचे उद्‌गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेत झालेल्या 'एमएसएमई' दिनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्य सरकार आयटी क्षेत्रातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देत आहे, त्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत.

मात्र, आता केवळ आयटीपुरते मर्यादित न राहता, इतर क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठीही राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे. गोव्यातील पारंपरिक कुणबी साडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या नावलौकिकाबद्दल त्यांनी कौतुक केले.

ते म्हणाले, आपण मुख्यमंत्री होण्यापूर्वी या साडीचा वापर फारसा केला जात नव्हता. 'स्वयंपूर्ण गोवा' या योजनेच्या माध्यमातून स्थानिक उत्पादने, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, उद्योजकता आणि पारंपरिक वारशाचा विकास यावर भर दिला जात आहे. राज्यात पर्यटन, आदारातिथ्य क्षेत्रात लहान उद्योग सुरू करण्यासाठी अनेक संधी आहेत.

केवळ नोकरी करणार ही मानसिकता सोडून द्यावी. स्थानिकांनी या संधी न घेतल्याने बाहेरील लोक घेत आहेत, लवकरच आयटी व्यतिरिक्त अन्य क्षेत्रातील स्टार्टअपना देखील अनुदान देण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री म्हणाले की, गोवा हे केवळ पर्यटनाचे केंद्र न राहता, नव्या उद्योगांचे आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचेही केंद्र व्हावे.

'ही गोव्यासाठी अभिमानाची बाब'

मुख्यमंत्री म्हणाले, की गोवा हे महिला नेतृत्वासाठी सक्षम व्यासपीठ बनत आहे. ५० टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली असणे ही गोव्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या पाठीशी सरकार पूर्णपणे उभे आहे.

महिला उद्योजकतेला सरकारचा पाठिंबा ती पुन्हा समाजाच्या वापरामध्ये आली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिची दखल घेतली LD जाऊ लागली. गोव्यातील स्थानिक परंपरा, हस्तकला आणि कापड उद्योगाला जर योग्य दिशा दिली, तर जागतिक बाजारपेठेतही यातील उत्पादनांची दखल घेतली जाऊ शकते.

महिला उद्योजक कक्षाची स्थापना

१) महिलांना उद्योजक बनण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि आवश्यक ते सहकार्य देण्यासाठी सरकार विशेषतः महिलांसाठी महिला उद्योजकता कक्ष स्थापन करणार आहे.

२) राज्यात उत्पादन क्षेत्रात महिलांची वाढ होत आहे, गोव्यात ५०% स्टार्टअप महिलांनी सुरू केले आहेत ही निश्चितच प्रेरणा देणारी बाब आहे. महिलांनी स्टार्टअपमध्ये केलेला प्रवेश हा स्वावलंबाकडे नेणारा असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT