Chess Competition 
गोवा

Chess Competition: गोव्याचा बुद्धिबळपटू अमेय अवदी पोर्तुगालमध्ये चमकला

संयुक्त अव्वल कामगिरीनंतर गोव्याच्या इंटरनॅशनल मास्टरला तिसरा क्रमांक

किशोर पेटकर

Chess Competition: गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) अमेय अवदी याने पोर्तुगालमधील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार खेळ केला. पहिल्या सिदाद द लागोस खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत त्याने इतर तिघांसह संयुक्त अव्वल क्रमांक मिळविला, टायब्रेकर गुणांत त्याला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले.

युक्रेनचा ग्रँडमास्टर (जीएम) विताली बेर्नाडस्की, अझरबैजानचा जीएम एल्ताज साफारली, नेदरलँड्सचा आयएम मान्युएल बोसबूम व अमेय यांचे प्रत्येकी नऊ डाव खेळल्यानंतर समान सात गुण झाले.

टायब्रेकर गुणांत विताली याला विजेतेपद, तर एल्ताज याला उपविजेतेपद मिळाले. अमेय तिसऱ्या स्थानी राहिला. बोसबूमला चौथ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. स्पर्धेत २० देशांतील बुद्धिबळपटूंचा सहभाग होता.

अपराजित वाटचाल

अमेयने पोर्तुगालमध्ये अपराजित वाटचाल राखली. त्याने पाच डाव जिंकले, तर चार बरोबरीची नोंद केली. त्याने कॅनडाचा जीएम केविन स्प्रॅग्गेट्ट, जर्मनीचा जीएम मायकल हॉफमन, भारतीय आयएम हिमल गुसैन व जीएम विताली बेर्नाडस्की यांना बरोबरीत रोखले.

अमेयने विजय नोंदविलेल्या प्रमुख खेळाडूंत स्पॅनिश आयएम अल्शामेएरी प्यएन्ते इस्माईल, पोर्तुगीज फिडे मास्टर ब्रुनो मार्टिन्स यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT