Gunjan Pankaj Prabhu Narvekar ANI
गोवा

गोव्याच्या 12 वर्षीय गिर्यारोहक गुंजनची वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी, 6000 मीटरची तीन शिखरे विक्रमी वेळेत केली सर

गुंजनचे जगातील सर्वोच्च शिखर सर करण्याचे ध्येय आहे.

Pramod Yadav

गोव्याच्या 12 वर्षीय गिर्यारोहक गुंजनची वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे. गुंजन पंकज प्रभू नार्वेकरने लडाखच्या मार्का खोऱ्यातील 6000 मीटरवरील तीन शिखरे अवघ्या 62.5 तासांत यशस्वीपणे सर केली आहेत.

गुंजन इयत्ता आठवीत शिक्षण घेते. गुंजनचे (Gunjan Pankaj Prabhu Narvekar) पुढचे लक्ष्य आता माऊंट एव्हरेस्ट असल्याचे तिने म्हटले आहे.

गुंजनने लडाखच्या मार्का खोऱ्यातील माउंट कांग येतसे-II (6250 मीटर), माउंट रेपोनी मल्लारी-I (6097 मीटर 13 मीटर) आणि माउंट रेपोनी मल्लारी-I (6097 मीटर) अशी तीन शिखरे यशस्वीरित्या सर केली आहेत.

6000 मीटर उंचीची पहिले ते तिसरे शिखर गुंजनने 49 तासांत सर केले तर, बेसकॅम्प ते बेसकॅम्प तिने 62.5 तासांत चढून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

गुंजनचे जगातील सर्वोच्च शिखर सर करण्याचे ध्येय आहे. "भविष्यात, मी 7000 मीटर शिखर सर करण्याचा विचार करत आहे, परंतु भारतात, 16 वर्षांच्या नसलेल्या व्यक्तीला 7000 मीटर शिखर सर करण्याची परवानगी नाही, त्यामुळे मी भारता बाहेर शिखर सर करणार आहे. माऊंट एव्हरेस्ट आणि अन्नपूर्णा शिखर सर करण्याची माझी इच्छा आहे." असे गुंजन एएनआयशी बोलताना म्हटले आहे.

दरम्यान, गुंजन नार्वेकर हिने जानेवारी 2023 मध्ये लडाखमधील गोठलेल्या जंस्कार नदीवर 'चादर ट्रेक' पूर्ण केला आहे. विक्रमी वेळात हा ट्रेक पूर्ण करणारी गुंजन ही भारतातील सर्वात तरुण मुलगी ठरली आहे. -20° ते -30° तापमानात तीने हा ट्रेक पूर्ण केला आहे होता. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT