Anjuna Police  Dainik Gomantak
गोवा

Anjuna Police: हणजुणे पोलिसांचे कौतुकास्पद काम, मान्सूनपूर्व शालेय विद्यार्थ्यांना दिली महत्वाची भेट

हणजुणे पोलिसांनी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Pramod Yadav

Anjuna Police: गोव्यातील शाळा सुरू होऊन दोन आठवडे पूर्ण होत आहेत. सर्व शाळा आता पूर्ण क्षमतेने भरत आहेत. राज्यात पाऊस सुरू होण्याला थोडा विलंब झाला असला तरी, काही भागात आता पाऊस सक्रिय व्हायला सुरूवात झाली आहे.

मागील दोन दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडला. दरम्यान, उत्तर गोव्यातील हणजुणे पोलिसांनी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना महत्वाची भेटवस्तू दिली आहे.

हणजुणे पोलिसांनी पाच सरकारी प्राथमिक शाळांना भेट दिली. पोलिसांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत, शाळेतील 150 विद्यार्थ्यांना छत्र्या भेट दिल्या आहेत. पोलीस निरिक्षक प्रशाल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम राबविण्यात आली आहे. हणजुणे पोलिसांनी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गोव्यात आता पावसाचा जोर वाढत आहे. शाळा देखील पूर्ण क्षमतेने भरू लागल्या आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी पावसापासून बचाव व्हावा म्हणून पोलिसांनी विद्यार्थ्यांना छत्री भेट दिली आहे. हणजुणे पोलिसांनी सामाजिक भावनेतून केलेल्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

SCROLL FOR NEXT