Power Tariff Hike in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Power Tariff Hike: आधी केबल ऑपरेटर्सकडून वसुली करा! प्रस्तावित वीज दरवाढीला गोमंतकीयांचा तीव्र विरोध

Goa Power Tariff Hike: वीज खात्याच्या आपली जुनी येणी वसूल करण्यात अपयश आले आहे. यासाठी वसूल आणि चौकशी करण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणे गरजेचे आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: संयुक्त वीज नियामक आयोगाकडे राज्याच्या वीज खात्याने मागणी केलेल्या सरासरी ५.९५ टक्के दरवाढीला जनसुनावणीत नागरिकांनी, विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी तीव्र विरोध केला. वीज खाते पुढील पाच वर्षांसाठी दरवाढ करू इच्छित आहे, परंतु या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योगांवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवेल.

कृषी आणि स्टार्टअपसना देखील याचा फटका बसणार आहे. त्यामुळे ही दरवाढ रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

आधी केबल ऑपरेटर्सकडून वसुली करा !

वीज खात्याच्या आपली जुनी येणी वसूल करण्यात अपयश आले आहे. यासाठी वसूल आणि चौकशी करण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणे गरजेचे आहे. कुणाच्याही चुका झाल्या असल्या तरी त्याची भरपाई सर्वसामान्य नागरिकांना दरवाढीच्या माध्यमातून करावी लागते.

राज्यात केबल ऑपरेटर्सकडून वसुली करण्यात वीज खाते अपयशी ठरत आहे. त्यांच्याकडून प्रलंबित रक्कम वसुल करून घ्यावी जेणेकरून दरवाढ करावी लागणार नाही, अशी मागणी सुनावणीला उपस्थित राहिलेल्या नागरिकांनी यावेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

VIDEO: वैमानिकाची एक चूक अन् 8 प्रवाशांचा खेळ खल्लास, 5 मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं; इंडोनेशियातील बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर क्रॅश

Watch Video: अय्यरच्या 'सुपरमॅन' अवतारावर रोहित-सूर्याचे विस्फारले डोळे, चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; श्रेयसचा धडाकेबाज कॅच व्हायरल

Omkar Elephant: 'ओंकार'चा उगवे भागात धुमाकूळ, संतप्त नागरिकांकडून सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा

Cavelossim Assolna bridge: केळशी-असोळणा पुलाची धोकादायक फट बुजवली, वॉरन यांनी वेधले लक्ष; 4 तासांत रस्‍त्‍याची दुरुस्‍ती

SCROLL FOR NEXT