Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

गोमंतकीयांचे जीव धोक्यात! एमव्हीआर इन्फ्राला सरकारचे संरक्षण, कंत्राटदार भाजपचा जावई; काँग्रेस

एमव्हीआर इन्फ्राने झुआरी IAV प्रा. लि. च्या इंधन वाहिनीला हानी पोहोचवली, ज्यामुळे हजारो गोमंतकीयांच्या जिवाला धोका निर्माण झालाय; अमित पाटकर

Pramod Yadav

एमव्हीआर इन्फ्रा प्रा. लि. या कंत्राटदाराची ख्याती निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांसाठी, भ्रष्टाचारासाठी आणि अनेक लोकांचे प्राण संकटात घालण्यासाठी झाली आहे. तरीही, भाजप सरकारच्या संरक्षणाखाली एमव्हीआर इन्फ्रा बिनधास्तपणे काम करत आहे, असे म्हणत गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीने एमव्हीआर कंत्राटदाराच्या बेफिकिरीचा आणि जीवघेण्या निष्काळजीपणाचा निषेध केला.

एमव्हीआर इन्फ्राने झुआरी IAV प्रा. लि. च्या इंधन वाहिनीला हानी पोहोचवली, ज्यामुळे हजारो गोमंतकीयांच्या जिवाला धोका निर्माण झाला. एका मोठ्या स्फोटाची शक्यता होती, मात्र सरकार आणि प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही.

एमव्हीआर इन्फ्राला अनेक वेळा तंबी दिली होती, तरीही त्यांनी निष्काळजीपणा सुरूच ठेवला. अशा परिस्थितीतही कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही? याचे कारण एमव्हीआर इन्फ्राला मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजप सरकारचे संरक्षण असून, हा कंत्राटदार भाजपचा जावई आहे! अशी टीका काँग्रेसने केली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी या जीवघेण्या कंत्राटदाराला अजून किती काळ वाचवणार? किती जणांचे प्राण गेले की सरकारला जाग येणार? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.

काँग्रेसच्या प्रमुख मागण्या:

- एमव्हीआर इन्फ्राला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करावे आणि त्यांचे सर्व कंत्राटे रद्द करावेत.

- हजारो लोकांचे प्राण धोक्यात घालणाऱ्या एमव्हीआर इन्फ्रावर फौजदारी गुन्हा दाखल करावा.

- त्यांच्या वारंवार केलेल्या निष्काळजीपणाची सखोल चौकशी करावी.

- भाजप नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांनी एमव्हीआरला दिलेले संरक्षण तात्काळ बंद करावे आणि जबाबदारी निश्चित करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Airstrike Afghanistan: पाकड्यांचा अफगाणिस्तानवर पुन्हा एअरस्ट्राइक! कुनार अन् पक्तिका प्रांतावर केला बॉम्बवर्षाव; अनेक जण गंभीर जखमी

Goa Crime: मोखर्ड येथे एकाच घरात दोन बहिणींचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; दुर्गंधी आल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

SCROLL FOR NEXT