Seafarers Pension Scheme Dainik Gomantak
गोवा

Seafarers Pension Scheme: 'खलाशी पेन्शन' बाबत गोवन सिफेरर्स असोसिएशने केलीय 'ही' मागणी

आर्थिक ओढाताण : गोवन सिफेरर्स असोसिएशनची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Seafarers Pension Scheme सरकारने खलाशांसाठीची पेन्शन योजना कायमस्वरूपी करण्याचे आश्र्वासन दिले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतही त्याचा पुनरुच्चारही केला होता.

मात्र, अजून सरकारने निवृत्त खलाशी आणि त्यांच्या विधवांसाठीची पेन्शन योजना अधिसूचित केलेली नाही. गोवन सिफेरर्स असोसिएशनचे अध्यक्ष फ्रॅंकी व्हिएगस म्हणाले की, या योजनेच्या अधिसूचनेची आम्ही आतुरतेने वाट पाहात आहोत.

जोपर्यंत अनिवासी भारतीय व्यवहार खात्याकडे पुरेसा निधी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत ही योजना सुरू होणे कठीण असल्याचे बोलले जाते. सरकारने दिलेल्या आश्र्वासनाची पूर्तता न केल्याने निवृत्त खलाशी, त्यांच्या विधवा आणि इतर संघटनाही निराश झाल्या आहेत.

खलाशांना भरपूर पगार असतो आणि ते आर्थिकदृष्ट्या भक्कम असतात, अशी जी लोकांची भावना आहे ती चुकीची आहे. कित्येक खलाशांना योग्य वेतन मिळत नाही.

कधी कधी वेतन नसतानाही काम करावे लागते. बोटीवर काम करताना भरपूर कष्ट करावे लागतात, अनेक यातना सहन कराव्या लागतात, असे फ्रॅंकी व्हिएगस म्हणाले.

अर्जांची छाननीही नाही!

राज्य सरकारने आश्र्वासन दिले असले, तरी वास्तविकता वेगळीच आहे. आमच्या काही निवृत्त झालेल्या खलाशांनी अर्ज केले आहेत. तेसुद्धा अधिसूचनेची वाट पाहात आहेत.

नवीन अर्ज एनआरआय खात्याकडे सुपूर्द केले आहेत. मात्र, या अर्जांची छाननी केलेली नाही, अशी माहिती फ्रॅंकी व्हिएगस यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT