गोवा

भाड्याच्या खोलीत गावठी कट्टा, तलवारी, चोरीचे दागिने; गोव्यातील एकाला कणकवलीत अटक, 30.48 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई गोवा हायवे रोडवर, वागदे डंगळवाडी येथे बुधवारी कणकवली पोलिसांनी ही कारवाई केली.

Pramod Yadav

कणकवलीत भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या गोव्यातील एकाला गावठी कट्टा, तलवारी, चोरीचे दागिने जवळ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुंबई गोवा हायवे रोडवर, वागदे डंगळवाडी येथे बुधवारी (दि.12) सायंकाळी कणकवली पोलिसांनी (Kankavli Police) ही कारवाई केली.

पोलिसांनी त्याच्याकडून 30 लाख 48 हजार 784 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्रकाश विनायक पाटील (वय 38, रा. घाट वाडा, पडोसे,सत्तरी) असे अटक इसमाचे नाव आहे.

याप्रकरणी सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कृष्णा आत्माराम केसरकर (वय - 43) यांनी फिर्याद दिली आहे.

कणकवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश पाटील याने कार मध्ये तसेच, भाड्याने राहत असलेल्या खोलीत बिगर परवाना गावठी कट्टा, जिवंत राऊंड ,काडतुसी बंदूक व जिवंत काडतुसांसह धारदार व घातक तलवारी तसेच चोरीचे दागिने बाळगले होते.

पोलिसांनी पाटील याला अटक केली असून, त्याच्याकडून 30 लाख 48 हजार 784 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल

चाकू, कटावणी, मोबाईल, तलवारी, कोयता, हातोडा, इलेक्ट्रिक सोने व चांदी वितळविण्यासाठी वापरण्यात येणारी भट्टी, ड्रिल मशीन, एकूण 160 वेगवेगळ्या देशांची परदेशी नानी, एक सिंगल बॅरल काडतुशी बंदूक, एकूण 27 जिवंत काडतुसे, पल्सर मोटरसायकल, सोन्याचे आणि चांदिचे दागिने असा एकूण 30 लाख 48 हजार 784 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT