Goan people experiences second hottest march since 2013
Goan people experiences second hottest march since 2013 Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 2013 नंतर यंदाचा मार्च सर्वात उष्ण

दैनिक गोमन्तक

पणजी: यंदा गोव्यात मार्चमध्ये 34.2 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. 2013 नंतरचे मार्च महिन्यातील हे सर्वाधिक तापमान आहे. त्यावेळी सर्वाधिक 34.6 एवढ्या तापमानाची नोंद होती असे वेधशाळेने सांगितले. (goan people experiences second hottest march since 2013)

दरम्यान, शनिवारपासून राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आहे. शनिवारी पणजी (Panaji) येथे कमाल 33.3 तर किमान25.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसानंतर (Rain) आता तापमानात वाढू लागले आहे. दुपारच्‍या वेळी तर घराबाहेर पडणे कठीण बनले आहे. उकाड्यापासून गारवा मिळावा यासाठी लोक शहाळे, ऊसाचा रस, विविध फळांचे रस, शीतपेये, आयस्क्रीमला (Ice cream) प्राधान्य देत आहेत.

पावसाची शक्यता

येत्या 4 एप्रिलपर्यंत गोवा-कर्नाटक प्रदेशात पूर्वेकडील वाऱ्यांसह कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे 4 आणि 5 एप्रिल रोजी राज्यात एक -दोन ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT