Goan Food Dainik Gomantak
गोवा

Goan Food: गोवन फिश फ्रायसारख्या पदार्थांना पर्यटकांची पसंती

दैनिक गोमन्तक

Goa: राज्यात नववर्ष स्वागताची तयारी उत्साहात सुरू आहे. नववर्ष स्वागतासाठी लाखो पर्यटक गोव्यात आले असून हॉटेल्स, समुद्रकीनारे विविध पर्यटनस्थळांवर गर्दी होताना दिसत आहे. अशातच मासे, चिकण, मटण, अंडी आदींच्या मागणीत वाढ झाली असून सकाळपासूनच खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.

राज्यातील सर्व हॉटेल्स फुल्ल झाल्याने खास गोमंतकीय मत्स्यपदार्थ, चिकन, मटण आणि अंड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. विशेषतः अनेक पर्यटक प्रामुख्याने खास गोवन फिश फ्रायसारख्या पदार्थांना मोठ्या प्रमाणात पसंती देत असल्याने त्यांच्या दरातदेखील वाढ झाली आहे.

इसवण, कोळंबी, पापलेट, माणकी, लेपो, खुबे आदी माशांना अधिक मागणी आहे. एरव्ही शंभर रुपये प्रतिकिलो मिळणारे बांगडे दीडशे रुपये तर पापलेट हजार ते बाराशे रुपये, कोळंबी आकाराप्रमाणे 400 ते 600 रुपये, इसवण 600 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. चिकन 160 रुपये किलो तर मटण 800 रुपये किलो दराने विकले जात आहे.

पर्यटकांसोबत राज्यातील नागरिकदेखील नववर्ष स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. समुद्रकिनारी, विविध पर्यटनस्थळांवर, निवासस्थानी जल्लोषी वातावरण असून ग्रामीण भागातदेखील मासळी आणि इतर पदार्थ खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.

अनेक पर्यटक गोव्यात केवळ गोमंतकीय खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी येतात. गोव्यातील फिश फ्राय, प्रामुख्याने झसवण, कोळंबी, पापलेट फ्रायवर ताव मारणे, चिकन क्राफीयाल आदी पदार्थांचा मनमुरादपणे आनंद लुटण्यास अनेक खवय्यांना आवडते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT