Damu Naik And Ravi Naik Dainik Gomantak
गोवा

Bhandari Samaj: भंडारी समाजात नेतृत्वबदलाच्या हालचाली तीव्र, समाज दुभंगणार; रवींचा पुढाकार

Gomantak Bhandari Samaj: गोव्याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या दोन घटना भंडारी समाजात वेगाने घडत असून त्या हालचालींकडे भाजपने बारीक लक्ष ठेवले आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोव्याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या दोन घटना भंडारी समाजात वेगाने घडत असून त्या हालचालींकडे भाजपने बारीक लक्ष ठेवले आहे. एक गट जातीनिहाय सर्वेक्षणाची मागणी नेटाने लावून धरीत असतानाच भाजपमधील भंडारी नेतृत्वाने भंडारी समाजाची पर्यायी समिती तयार केली आहे.

दयानंद मांद्रेकर आणि किरण कांदोळकर या भंडारी नेत्यांनी गेले काही महिने भंडारी समाजात राजकीय जागृती निर्माण करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्यांनी महिनाभर देव रूद्रेश्‍वराची रथयात्रा संपूर्ण गोव्यात फिरविली.

व्यक्तिगतरित्या त्यात सहभाग घेतला व आता जातीनिहाय सर्वेक्षणासाठी राजकीय गाठीभेटी चालविल्यामुळे भाजप नेतृत्वाला ‘जाग’ आली. त्यामुळेच भाजपमधील समाजाचे ज्येष्ठ नेते श्रीपाद नाईक आणि दामू नाईक यांनाही त्या मागणीला पाठिंबा दर्शवावा लागला.

त्याच पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी कृषिमंत्री तथा भंडारी समाजाचे प्रमुख नेते रवी नाईक यांची भेट घेतली. सूत्रांच्या मते, गेल्या आठवड्यात रवी नाईक यांच्या निवासस्थानी भंडारी समाजाच्या एका गटाच्या झालेल्या बैठकीचा तिला संदर्भ होता. देवानंद नाईक आणि अशोक नाईक यांच्या भंडारी समाजाच्या नेतृत्वावर विश्‍वास नसलेल्या नेत्यांची ही बैठक रवी नाईक यांनी बोलाविली होती.

रवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत नवीन पर्यायी समितीवर एकमत झाले असून नवे अध्यक्ष म्हणून माजी शिवसेना नेते उपेंद्र गावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

या प्रतिनिधीने उपेंद्र गावकर यांच्याशी संपर्क साधला असता, अशी बैठक झाल्याचे त्यांनी मान्य केले; परंतु संघटनेची नवी रणनीती येत्या मंगळवारी निश्‍चित केली जाणार असल्याची माहिती दिली. सूत्रांच्या मते, येत्या मंगळवारी उपेंद्र गावकर यांच्या नेतृत्वाखाली नवी समिती जाहीर केली जाणार आहे.

दुसऱ्या बाजूला गेल्या वर्षी रितसर निवडून आलेल्या भंडारी समाजाच्या नेत्यांनी दुसरी पर्यायी समिती निर्माण करण्याच्या निर्णयाची ‘राजकीय उचापती’ या शब्दांत संभावना केली आहे. २४ नोव्हेंबर २०२४ पासून अधिकारावर आलेल्या समितीचे अध्यक्ष देवानंद नाईक यांनी ‘गोमन्तक’शी संवाद साधताना सांगितले, ‘‘आमच्या समितीला जिल्हा रजिस्ट्रारनी अधिकृत मान्यता देऊन तसे प्रमाणपत्र दिले आहे.’’

‘‘आमची समिती अधिकृत आहे, तिचे उच्चाटन करण्याचा अधिकार कोणाला नाही’’ असे सांगून देवानंद नाईक म्हणाले, ‘‘ जातीनिहाय सर्वेक्षणाची मागणी घेऊन सध्या कोणी काही नेत्यांना भेटत आहेत. आम्ही ही मागणी यापूर्वीही केली आहे. पुढच्या सर्वसाधारण सभेत ही मागणी आम्ही जरूर ठेवू व लोकांचा तिला पाठिंबा असेल तर हजारोंच्या संख्येने येऊन त्यांनी तिला जरूर पाठिंबा द्यावा.

आमची समिती रितसर निवडून आली आहे. तिला आता अधिकृत मान्यता आहे, ती कोणाला हटवता येणार नाही.
देवानंद नाईक
रवी नाईकांच्या उपस्थितीत भंडारींचे १० महत्त्वाचे नेते जमले, आमचा संघटनात्मक विचार मंगळवारी जाहीर करू
उपेंद्र गावकर, भंडारी समाज नेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT