dog pitchure 
गोवा

भटक्या कुत्र्यांसंबंधी गोवाकॅनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Mangesh Borkar

फातोर्डा, मडगाव शहरासह दक्षिण गोव्यातील इतर भागांमध्ये रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा त्रास व्हायला लागला आहे. रस्त्यावर शेकडो कुत्रे भटकताना दिसतात. या कुत्र्यांनी लोकांनाही चावा घेतल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. शिवाय रहदारीला जास्त करून दुचाकी स्वारांना जास्त त्रास जाणवू लागला आहे. रस्त्याच्या मधोमध कुत्रे आल्याने अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाले आहेत. या सर्व प्रकारांची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी असे निवेदन गोवाकॅनने दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांना निवदेन सादर केले आहे.

सप्टेंबर महिन्यात जागतिक पर्यावरण दिन व जागतिक रॅबिज दिन साजरा होत आहे. त्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी असे संस्थेचे समन्वयक रोलांड मार्टिन्स यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना मडगावी व कोलवा, बाणावली सारख्या समुद्र किनाऱ्यांवर घडत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ तसेच आरोग्य केंद्राकडून अशा घटनांचा अहवाल मागून घ्यावा अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनात जिल्हाधिकाऱ्यांना अनेक सूचना केल्या आहेत. त्यांत पशुसंवर्धन व चिकित्सा खात्याकडून किती शिफारशी आल्या आहेत याची चाचपणी करणे, मिशन रॅबिज संस्थेने पाहणी करून अहवाल तयार करणे, पंचायत क्षेत्रांतील पंचायतीकडून अशा घटनांची आकडेवारी घेणे याचा समावेश आहे.

संपादन हेमा फडते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

SCROLL FOR NEXT