Panjim Bus Stand Dainik Gomantak
गोवा

GOACAN : गोवाकॅनची पणजी बसस्थानकावर अतिक्रमण विरोधात निदर्शने

परवाना मुदत संपूनही चहाचा स्टॉल सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji : पणजी कदंबा बसस्थानक परिसरात दिव्यांगांना व ज्येष्ठांना ये-जा करण्यासाठी असणाऱ्या मार्गावर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्याशिवाय व्यवसाय परवाना मुदत संपूनही येथील चहा स्टॉलधारकाने व्यवसाय सुरू केलेला आहे. या विरोधात गोवा कॅन या बिगर सरकारी संस्थेने बसस्थानक परिसरात सोमवारी निदर्शने केली.

एका नामांकित कंपनीच्या चहाची फ्रँचाईझी घेतलेल्या गोव्यातील व्यावसायिकाने कदंबा बसस्थानक परिसरात दिव्यांगांना व ज्येष्ठ लोकांना ये-जा करण्यासाठी असणाऱ्या मार्गावर अतिक्रमण केले आहे. याठिकाणी शेडची भारणी सुरू आहे. हे सर्व काम बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा आरोप गोवा कॅनचे मार्टिन यांनी केला आहे. त्याशिवाय 31 मार्च 2022 रोजी चहा व्यावसायिकाच्या व्यवसाय परवान्याची मुदत संपलेली आहे. तरीही हा व्यवसाय बेकायदेशीरपणे सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे रस्ता अडविल्याप्रकरणी तक्रारी दिली होती.

65 लाखांची निविदा

बसस्थानकावरील खराब झालेले पत्रे बदलण्यासाठी वाहतूक खात्याने 65 लाख रुपयांची निविदा काढली, पण येथे झेब्रा क्रॉसिंग काढण्यात आलेले नाही. या बसथांब्यावर झेब्रा क्रॉसिंग नसल्याने बसेस भरधाव ये-जा करतात. मागील दहा वर्षांत दोघांचा याठिकाणी अपघाती जीव गेला आहे. तरीही झेब्रा क्रॉसिंग याठिकाणी तयार केले जात नाही. गोवा कॅनच्या सदस्यांनी या बेकायदेशीर कामाविषयी आणि व्यवसायाविषयी घोषणाही दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: गोव्यात 'फॅमिली पॅक' स्टंट! स्कुटीवरुन एक दोन नव्हे तर 5 जणांचा जीवघेणा प्रवास; गवंडाळी येथील थरारक व्हिडिओ व्हायरल

Dabolim Airport: लवकरच येणार दाबोळी विमानतळ बंदचा आदेश? खासदार फर्नांडिस यांनी उघड केलं गुपित; 'ती' गुप्त फाईल रोखण्याची केली मागणी VIDEO

VIDEO: युवराज इज बॅक! 6 षटकार, 11 चौकार... न्यूझीलंडच्या गोलंदाजांना लोळवलं; ठोकलं वादळी शतक!

Goa Leopard Attack: सत्तरीत वन्यप्राण्यांची दहशत! बिबट्याच्या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Kalamba Devi Sathpurush Divjotsav: डिचोली येथील कळंबा देवीच्या मंदिरात दिवजोत्सव साजरा

SCROLL FOR NEXT