Zilla Panchayat polls Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: "दाल में कुछ काला है!", सरदेसाईंचा भाजपवर हल्ला; विरोधी पक्षांना दिला '30-10-10'चा फॉर्म्युला

Goa ZP elections alliance: गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी युतीसाठी महत्त्वपूर्ण जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे.

Akshata Chhatre

Vijai Sardesai 30-10-10 formula: आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी विरोधी पक्षांची युती आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी या युतीसाठी महत्त्वपूर्ण जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे.

विजय सरदेसाईंचे ३०-१०-१० चे सूत्र

सोमवारी (दि. २४ नोव्हेंबर) रात्री काँग्रेस नेतृत्वाने जागावाटपावर चर्चा करण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला असून, अजूनही काही जागांवर वाटाघाटी सुरू आहेत, अशी माहिती सरदेसाई यांनी दिली आहे. तसेच, भाजपवर टीका करताना त्यांनी झेडपी निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याबद्दल गंभीर शंका उपस्थित केली आहे.

विरोधी पक्षांच्या युतीमध्ये चांगली प्रगती झाल्याचे सांगत, विजय सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्ड, काँग्रेस आणि रिव्होल्युशनरी गोअन्स या पक्षांना एकत्र आणण्यासाठीचा आपला प्रस्ताव उघड केला. "मी काँग्रेसला ३० जागा, तर 'आरजी' आणि गोवा फॉरवर्डला प्रत्येकी १० जागा असा फॉर्म्युला दिला होता."

काँग्रेस नेतृत्वाने काल रात्री माझ्याशी काही जागांवर चर्चा केली आहे आणि चर्चा अजूनही सुरू आहे. सर्व गोष्टींवर लवकरच एकमत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. जागावाटपात अजूनही काही मतभेद आहेत. सरदेसाई म्हणाले, "काही जागा अशा आहेत जिथे मला वाटते की माझा उमेदवार उभा राहावा, तर त्यांची (काँग्रेसची) वेगळी कल्पना आहे."

झेडपी निवडणुकांवर प्रश्नचिन्ह; 'दाल में कुछ काला है क्या?'

झेडपी निवडणुकीची तारीख जवळ येत असतानाही शेवटच्या क्षणी होत असलेले बदल आणि भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर न करण्याच्या धोरणाबद्दल सरदेसाई यांनी थेट सरकारवर हल्ला चढवला. निवडणूक थांबवण्याचा प्रयत्न? सरदेसाई यांनी म्हटले, "झेडपी निवडणुकांबद्दल अजूनही संभ्रम आहे, शेवटच्या क्षणी बदल होत आहेत. सरकार या निवडणुका थांबवण्याचा प्रयत्न करत आहे की काय, असा प्रश्न पडतो."

'दाल में कुछ काला है क्या?'

"भाजप आपली उमेदवारांची यादी का जाहीर करत नाहीये? 'दाल में कुछ काला है क्या?' असा थेट प्रश्न विचारत सरदेसाई यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर गंभीर शंका व्यक्त केली. विजय सरदेसाई यांनी जाहीर केलेला जागावाटपाचा हा फॉर्म्युला आता युतीसाठी महत्त्वाचा आधार ठरणार असून, आज (दि.२५) काँग्रेस नेते यावर अंतिम निर्णय घेतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

IND vs SA 2nd Test: केएल राहुलला टर्न समजलाच नाही, सायमन हार्मरच्या 'अविश्वसनीय' चेंडूवर त्रिफळाचीत! तुम्ही VIDEO पाहिला का?

Smriti Mandhana: 'तिला' स्विमिंगसाठी विचारलं! पलाश मुच्छलचे भलत्याच मुलीसोबत चॅट्स व्हायरल; क्रिकेटर स्मृतीला मोठा धक्का?

Goa News: ५६ व्या IFFI मध्ये विविध राज्यांच्या लोकनृत्यांचे दर्शन; कलाकारांनी मानले आभार

SCROLL FOR NEXT