ZP elections Dainik Gomantak
गोवा

Goa ZP Election: "आम्हाला एकही उमेदवार नको असेल तर?" बॅलेट पेपरवर 'नोटा'चा पर्याय नाही; सुर्ल साखळीतील मतदारांची नाराजी

NOTA option missing: जिल्हा पंचायत निवडणुकीत बॅलेट पेपरवर हा पर्याय नसल्याने मतदारांनी संताप व्यक्त केलाय

Akshata Chhatre

साखळी: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना सुर्ल -साखळी येथील मतदारांनी एका महत्त्वाच्या मुद्द्यावरून आपली नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम (EVM) मशीनवर 'नोटा' (NOTA) हा पर्याय उपलब्ध असतो, मात्र जिल्हा पंचायत निवडणुकीत बॅलेट पेपरवर हा पर्याय नसल्याने मतदारांनी संताप व्यक्त केलाय.

लोकशाहीत मतदारांचा हक्क डावलला?

जर रिंगणातील एकही उमेदवार पसंत नसेल, तर मतदारांनी आपले मत कोणाला द्यावे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. सुर्ल येथील प्रसिद्ध समाजसेवक प्रमोद नार्वेकर यांनी या संदर्भात मतदारांची बाजू मांडली. ते म्हणाले की, "लोकशाहीमध्ये मतदाराला आपला नापसंतीचा हक्क बजावण्याचा पूर्ण अधिकार आहे.

विधानसभा आणि लोकसभेला 'नोटा'चा पर्याय दिला जातो, मग पंचायत किंवा जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये हा भेदभाव का? या निवडणुकांकडे दुर्लक्ष न करता, येथेही मतदारांना सर्व पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे." बॅलेट पेपरवर 'नोटा'चा शिक्का मारण्याची सोय नसल्याने अनेक मतदारांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.

निवडणूक आयोगाकडे मागणी

मतदारांच्या मते, कोणत्याही निवडणुकीत उमेदवारांची निवड करताना मतदारांवर कोणा एकाला निवडण्याची सक्ती नसावी. जर उमेदवार योग्य वाटत नसतील, तर 'नोटा' हा पर्यायच लोकशाहीचे खरे स्वातंत्र्य दर्शवतो.

सुर्लतील ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, यापुढे कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत, त्यामध्ये 'नोटा'चा समावेश अनिवार्य असायला हवा, कारण असा पर्याय उपलब्ध असला तरच उपस्थित उमेदवारांना मतदारांनी का मत दिले नाही याचा विचार केला जाईल असे मत नार्वेकर यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT