Goa district panchayat elections Dainik Gomantak
गोवा

गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी अर्ज सादर; उत्तरेत भाजपच्या रेश्मा बांदोडकर, दक्षिणेत सिद्धार्थ गावस तर काँग्रेसतर्फे लुईझा रॉड्रिग्ज रिंगणात

Goa Zilla Panchayat president election: उपाध्यक्ष पदासाठी भाजपतर्फे बार्सेच्या सदस्या अंजली अर्जुन वेळीप यांनी दोन तर गोवा फॉरवर्ड तर्फे रायच्या सदस्य इनासिना पिंटो यांनी एक अर्ज सादर केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन प्रक्रियेला वेग आला असून रेईश मागूश जिल्हा पंचायत मतदारसंघाच्या सदस्या रेश्मा संदीप बांदोडकर यांनी अध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज आज सादर केला. हे पद महिलेसाठी राखीव आहे.

दक्षिणेतून भारतीय जनता पक्षाचे शेल्डेचे सदस्य सिद्धार्थ गावस देसाई यांनी दोन अर्ज तर काँग्रेसतर्फे बाणावलीच्या सदस्य लुईझा रॉड्रिग्ज यांनी एक अर्ज दाखल केला आहे. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी भाजप, कॉंग्रेस व गोवा फॉरवर्ड पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज सादर केल्याने या पदांसाठी निवडणूक अटळ झाली आहे.

अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे शेल्डेचे सदस्य सिद्धार्थ गावस देसाई यांनी दोन अर्ज तर काँग्रेसतर्फे बाणावलीच्या सदस्य लुईझा रॉड्रिग्स यांनी एक अर्ज दाखल केला आहे. उपाध्यक्ष पदासाठी भाजपतर्फे बार्सेच्या सदस्या अंजली अर्जुन वेळीप यांनी दोन तर गोवा फॉरवर्ड तर्फे रायच्या सदस्य इनासिना पिंटो यांनी एक अर्ज सादर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT