Goa Zilla Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

Goa Zilla Panchayat Election 2022: दवर्लीत 'कांटे की टक्कर'

Goa Zilla Panchayat Election: उल्हास तुयेकर यांचे खंदे समर्थक परेश नाईक हे रिंगणात आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Zilla Panchayat Election: उल्हास तुयेकर हे नावेलीचे आमदार बनल्यानंतर रिक्त झालेल्या दवर्ली जिल्हा पंचायत जागेवर भाजपतर्फे तुयेकर यांचे खंदे समर्थक परेश नाईक हे रिंगणात उतरलेले आहेत, मात्र या मतदारसंघात एकूण सात उमेदवार असल्याने ही लढत म्हणजे ‘काटे की टक्कर’ होणार आहे.

दरम्यान, या मतदारससंघात रुमडामळ, दीकरपाली व आके बायश या तीन पंचायतीचा समावेश आहे. मतदारसंघात ख्रिस्ती व हिंदू अशी प्रत्येकी 6 हजारांच्या आसपास मतदारांची संख्या आहे. आठ हजार मुस्लिम मतदार आहेत.

तसेच, यात सर्वाधिक मुस्लिम मतदार हे रुमडामळ पंचायत क्षेत्रात आहेत. ही मुस्लीम मते कुणाच्या बाजूने झुकतील, यावर या मतदार संघातील निकाल अवलंबून आहे. आता रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.

उल्हास तुयेकरांसमोर आव्हान

या निवडणूकीत भाजपने परेश नाईक यांना उमेदवारी दिली असून त्यांना दवर्ली दिकरपाल पंचायतीचे उपसरपंच म्हणून कामाचा अनुभव आहे. त्यांच्या विरोधात आम आदमी पक्षाचे सिद्धेश भगत हे उभे असून त्यांनीही यापूर्वी आके बायश पंचायतीचे सरपंचपद सांभाळले आहे.

काँग्रेस उमेदवार लियोन रायकर हेही दिकरपाली पंचायतीचे माजी पंच असून अपक्ष मुर्तूजा कुकनुर हेही रुमडामळ येथील माजी सरपंच आहे. त्यामुळे चार तगडे उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याकडेच राखून ठेवायचा आसल्यास आमदार उल्हास तुयेकर यांना सर्वस्वपणाला लावावे लागणार आहे.

मात्र इतरांची निराशा

मतदारसंघात काँग्रेस, आप व इतर पक्षातून अनेक नेते आपले कार्यकर्ते घेऊन या मतदारसंघातील उमेदवारी आपल्याला मिळणार या आशेने भाजपमध्ये दाखल झाल होते. मात्र परेश नाईक यांना उमेदवारी दिल्याने त्यांची निराशा झाली आहे.

‘आप’चे सिद्धेश भगत यांनी येथील पंचायत क्षेत्रातील लोकांची अनेक कामे केली आहेत. येथील लोकांच्या मागणीसाठी वेळोवेळी ते रस्त्यावर उतरलेले आहेत तसेच त्यांचे इतर पक्षाच्या नेत्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: शनीची उलटी चाल ठरणार निर्णायक! 'या' राशींवर पैशांचा वर्षाव, तर काहींना होऊ शकतो आर्थिक फटका

Income Tax Return: 31 जुलैची मुदत वाढणार का? आयटीआर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका

Dharmendra Pradhan Resigns: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवर जल्लोष! ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए…’,म्हणत अभिजीत दीपकेची टोलेबाजी VIDEO

Dharmendra Pradhan Resigns: सीजेपी आंदोलनापुढे अखेर मोदी सरकार झुकले! धर्मेंद्र प्रधान यांनी दिला केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा

Dona Paula Car Accident: वाहन पार्किंगचा हलगर्जीपणा चालकाला पडला महागात! उतारावरून गाडी थेट गॅरेजमध्ये, आलिशान वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT