Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa News : कोमरपंत समाजातील युवकांनी संस्कृती जपावी : सारा नाईक

Goa News : गुणवंत विद्यार्थ्यांचा पाटणे येथे गुणगौरव, फळझाडांचेही वाटप

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण, शिक्षणाबरोबरच कोमरपंत समाजातील युवा पिढीने लोकसंस्कृती जपावी, असे आवाहन काणकोणच्या नगराध्यक्षा सारा शंभा नाईक देसाई यांनी केले.

पाटणे येथील देवगीपुरुष देवस्थानच्या सभागृहात अखिल गोवा भूमिपुत्र क्षत्रिय कोमरपंत समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर काणकोणच्या माजी नगराध्यक्ष प्रार्थना नाईक गावकर, छाया सोयरू‌ कोमरपंत, नगरसेवक शुभम कोमरपंत, संघटक सचिव सुनय कोमरपंत, उपाध्यक्ष नरेश कोमरपंत, देवगीपुरुष देवस्थानचे अध्यक्ष रघुवीर कोमरपंत, सचिव संदीप कोमरपंत, संस्थापक अध्यक्ष सोयरू काेमरपंत, प्रकाश मेत्री, कुशाली वारीक व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी प्रार्थना नाईक गावकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी आयुष्का कोमरपंत, रिया कोमरपंत, श्रध्दा कोमरपंत, हर्ष कोमरपंत यांचा रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

सूत्रसंचालन संदीप कोमरपंत, तर नरेश कोमरपंत यांनी आभार मानले. यावेळी वन महोत्सव साजरा करून ३०० लोकांना कवाथे व फळझाडे वाटण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT